Categories: राजकीय

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या प्रस्तावांना मंजुरी द्या; अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची सूचना

(वेब/टीम )

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रकरणांना प्राधान्याने मंजुरी दिली जावी, अशा सूचना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज येथे राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहूद्देशीय सभागृहात आज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, शहाजी पवार, रोहन देशमुख, माऊली पवार, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी सांगितले की, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या प्रस्तावांचे निराकारण करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा. प्रकल्प अहवाल सनदी लेखापालाकडून तयार करून घ्यावा, कागदपत्रे व्यवस्थित तयार करावी.

राज्य शासनाने महामंडळाच्या कर्जाला हमी दिली आहे. त्यामुळे बँकांनी कर्जासाठी हमी अथवा जामीनदार मागू नये. राष्ट्रीयकृत बँकांनी याबाबत महामंडळाकडून आलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांची छाननी करून कर्ज प्रकरण मंजूर करावे, असेही श्री पाटील यांनी सां‍गितले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, प्रस्तांवात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्ती करुन घ्या. अर्ज़दारांशी चर्चा करा. अर्जदारांना वारंवार चकरा माराव्या लागू नये, यासाठी काळजी घ्या.

यावेळी माऊली पवार, प्रताप चव्हाण यांनी कर्ज प्रकरण मंजुरी करण्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे यांनी बैठकीत समन्वय साधला, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आभार मानले. यावेळी सकल मराठा समाज तसेच मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago