चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक टोला लगावत सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने नवी पेठेत मड बाईक रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज शुक्रवारी दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी गांधीगिरी आंदोलन हाती घेण्यात आले.

सोलापुर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात सर्वत्र खड्डे पडले असुन त्याचा, व भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी आज रोजी नवी पेठ सरस्वती बुक डेपो बोळात येथे उपरोधात्मक MUD BIKE RACE (मोटार रेस) स्पर्धेचे आयोजन करुण निषेध व्यक्त केला.

सोलापूर महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कुठलेही योग्य नियोजन न करता सोलापुर शहरात अनेक ठिकाणी रस्ते व ड्रेनेज व इतर कामे अतिशय संथगतीने सुरु असुन अनेक ठिकाणी खड्डे खणले आहेत, तसेच शहरात रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते आहेत हेच समजेना त्यातच पावसामुळे सर्वत्र चिखल, दलदलीचा साम्राज्य पसरले असुन यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे, नागरिक खड्यात पड़त आहेत, अपघात घडत आहेत अंगदुखीचे व इतर आजार शहरातील नागरिकांना होत आहेत, धुळीचा प्रचंड त्रास त्यामुळे ही नागरिकांना विविध आजार होत आहेत. शहरातील नागरिक संतप्त झाले आहेत. स्मार्ट सिटीचे कामे, निकृष्ट व अतिशय संथगतीने सुरु असुन सोलापूर आहे की खड्डेपुर हेच समजेना झाले. आजच माझ्या डोळ्यासमोर अपघात घडला. याचा निषेध म्हणून आज रोजी हे MUD BIKE RACE (मोटार रेस) आयोजित करुन शहरातील रस्ते या प्रकारचे आहेत हे दाखवून सोमपा मधील सत्ताधारी भाजपच्या कारभाराचा निषेध करत असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी बोलताना प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले म्हणाले की सत्ताधारी भाजपवाल्यांनी शहराची अवस्था अतिशय वाईट करुण ठेवली आहे कुंभकर्णी झोप घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी, रसत्यांची अवस्था प्रत्यक्ष दाखविण्यासाठी आज आंदोलन केले आहे. लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास सोमपाच्या सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांना शहरात फिरु देणार नसल्याचा इशारा दिला.

यावेळी सोलापूर शहर युवक अंबादास करगुळे, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, दक्षिण विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, महापालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, महेश लोंढे, संजय गायकवाड़, राहुल गोयल, शाहु सलगर, शरद गुमटे, राजेन्द्र शिरकुल, सुभाष वाघमारे, सौरभ सालुंखे, व्यंकटेश बोम्मन, शिव कोरे, शंकर माढेकर, मनोज यादव, भीम बज्जर, मोनेश घंटे, मिथुन जंगम, सचिन हेगड़े, प्रज्वल कांबळे यांच्यासह नवी भागातील नागरिक, व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago