सराईत गुन्हेगार दशरथ कसबे (D.K) यावर तिस-यांदा ‘एमपीडीए’

नागरिकांना मारहाण, दादागिरी, जागा हडपणे, बेकायदा सावकारी अशा गंभीर गुन्ह्यातून नागरीकांना त्रास देणाऱ्या डी.के. सामाजिक संघटनेचा संस्थापकाला शहर पोलीस आयुक्तालयाने एमपीडीए अंतर्गत कारवाई करून मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी पुण्याच्या येरवाडा कारागृहात रवानगी केली आहे.
दशरथ मधुकर कसबे ऊर्फ डी.के. (वय ४५, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी शस्त्राने हल्ला करणे, दंगा करणे, दरोडा टाकणे, दगडफेक करणे, बेकायदा खाजगी सावकारी करणे, कर्ज वसुलीसाठी त्रास देवून आत्महत्या करण्यास भाग पाडणे असे १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या विरुध्द दाखल आहेत.यापुर्वी सन २००४ आणि २०१६ मध्ये दोन वेळा त्याच्या विरुध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती परंतु त्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही असे दिसून आले. त्याच्या विरूध्द दोन महिन्यापूर्वी खाजगी सावकारी करून कर्जदाराला खंडणी मागून त्याला जीवे मारण्याची धमकी देवून त्रास दिल्याचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्याच्या विरूध्द पुन्हा एकदा एमपीडीए अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. त्याला मंगळवार दि. १ सप्टेंबर २०२० रोजी स्थानबध्द करून येरवडा तुरुंगात पाठवण्यात आले.

शहरात सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध व्यवसाय करणारे ,गुंड, समाजविघातक कृत्य करणारे यांची यादी तयार करण्यात आली असून त्याच प्रमाणे कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इफेक्ट ; आदेश जारी,ससेहोलपट थांबली,आता…जन्म- मृत्यू दाखले महापालिकेत मिळणार…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

5 mins ago

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

5 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

9 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 day ago