Categories: राजकीय

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी खासदार फंडातून 25 लाखांची मदत – रामदास आठवले

by MH13News,network

मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात आलेल्या पूराने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे आहे. या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या सर्व लोकांना न्याय देण्याची भूमिका केंद्र व राज्य शासनाची असल्याचे सांगून खासदार फंडातून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रति जिल्हा 25 लाख रूपये मदत देणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घोषित केले.

पलूस तालुक्यातील वसगडे, मिरज तालुक्यातील नांद्रे येथे स्थलांतरितांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रांना भेट देवून श्री.आठवले यांनी तेथील पूरग्रस्तांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे आदि उपस्थित होते.

पूरबाधितांना कायमस्वरूपी निवारा होईपर्यंत तात्पुरती घरे देण्यात येतील, असे सांगून श्री. आठवले म्हणाले, पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षितस्थळी घरे बांधता येतील असा आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील. शासन निकषाप्रमाणे देय असणारी रक्कम सर्व पूरग्रस्तापर्यंत व्यवस्थित पोहचतील याबाबत दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ येथे बोट उलटून झालेली घटना दुर्दैवी असून पुन्हा अशी घटना होणार नाही यासाठी दक्षता घेण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ब्रम्हनाळ दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

11 hours ago

Breaking | सोमवारी जिल्ह्यातील एस.टी. सेवा बंद

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकल मराठा समाजाने जिल्हा बंदची हाक दिली…

12 hours ago

आता…सोलापूर शहरात मास्कची सक्ती : पालकमंत्री दत्तात्रय भरणे

MH13News Network सोलापूर, दि. 19 : कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर…

12 hours ago

शहरात कोरोना चाचणी कमीच , पुन्हा 68 ‘पॉझिटिव्ह’ ;या परिसरातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.19सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 68 रुग्ण आढळले…

15 hours ago

सोलापूर | ग्रामीण 453 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; मृत्यू… जाणून घ्या…कोणत्या भागात

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

16 hours ago

तर…महापालिका मालामाल ; जुनी मिलच्या शेकडो कोटींच्या जागेवर सोडले पाणी -वाचा सविस्तर

सोलापूर- ( प्रतिनिधी ) - सोलापूर शहराच्या विकासाची वाट लावणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेने जुनी मिलच्या शेकडो…

1 day ago