मोहोळ: पाणीसाठा फक्त २० दिवसांपुरताच

0
6

  आष्टे-कोळेगाव बंधारा यंदा मे महिन्यात कोरडा पडण्याच्या मार्गावर

मोहोळ :  मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा आष्टे-कोळेगाव बंधारा दीड महिन्यात ३ मीटरने पाणी पातळी कमी झाली असून, उरलेला पाणीसाठा केवळ  २० दिवस पुरेल, एवढाच उरला आहे.भविष्यात  शहरासह वाड्यावस्त्यांवर पाणी प्रश्न निर्माण होणार आहे.   मोहोळ  शहराला सीना नदीवरील कोळेगाव बंधाºयातून पाणीपुरवठा होतो.

उजनी धरणातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात केवळ मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी सोडण्यात आले होते. बंधारा चार मीटरने भरला होता. परिसरात  चोरुन व सिंगल फेज लाईनवर चालणारे नवीन विद्युत पंप सर्वांकडे असल्याने नदी  रात्रंदिवस पाणी उपसा सुरु आहे. याकडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. यामुळे बंधाºयातील पाणी दीड महिन्यातच तीन मीटरने कमी झाले आहे. आजमितीला एक मीटर इतकेच पाणी शिल्लक राहिले असून ते केवळ २० दिवस पुरेल इतकेच आहे.

मागील महिनाभरात महसूल विभागाने निवडणुकीसाठी नगरपरिषदेची सर्वच यंत्रणा गुंतविल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडे दुर्लक्ष झाले. व वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्याबाबत सहकार्य केले नाही. पाटबंधारे विभागाची ही कसलीच मदत मिळाली नसल्याने ही पाणी पातळी घटल्याचे वाय.व्ही. पाटील कालवा निरीक्षक, पाटबंधारे विभाग, मोहोळ म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here