By-MH13 NEWS,वेब/टीम
धनगर समाजाला ना कर्ते शासनाच्या चुकीमुळे गेल्या ७०वर्षापासून आरक्षण मिळालं नाही,आरक्षणाची चळवळ ही जुनीच आहे.आजची चळवळ मात्र कागदोपत्री पुराव्यासह आहे. समाजातील बहुजन जागा झाला पाहिजे, हा या मागचा हेतु आहे. शासन जनावरांची गणना करते, मात्र आमच्या समाजाची का नाही ?असा प्रश्न उपस्थित केला.गट तट विसरुन कामाला लागा. येत्या विधानसभेचा आमदार धनगर समाजाचा झाला पाहिजे, असे स्पष्ट मत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात मांडले .
मोहोळ येथे आरक्षणाच्या मागणीसाठी व जनजागृतीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी पडळकर बोलत होते. यावेळी चांदापुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष उत्तम जानकर, बाळासो शेळके, संतोष वाकसे, चेतन नरोटे, सूनील बंडगर, समता गावडे, ऍड. विनोद कांबळे, मोहन होनमाने, नागनाथ क्षीरसागर, सोमेश क्षीरसागर, फंटु गोफने, दिपक गायकवाड, दादा करणावर, दादा पवार, काका देशमुख, सुनील पाटील, शामराव पाटील बीरू देवकते, गणेश गावडे, बाळासो वाघमोडे, शाहु देशमुख आदीसह बहुसंख्य समाज उपस्थित होता.
पडळकर पुढे म्हणाले की,’आरक्षण दिल्याशिवाय आता माघार नाही, अंधश्रदा बंद करा. समाजातील युवकांनी शिकुन प्रशासनात आले पाहिजे. आम्हाला सामाजिक आरक्षणाबरोबर राजकीय आरक्षण पाहिजे. सत्तेतला निम्मा वाटा पाहिजे.
उत्तम जानकर म्हणाले, सरकारने फसवणुक केली आहे. आरक्षण न देताच मते घेतली आहेत. जनजागृती सभा सुरू झाल्यापासून प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
आरक्षणासाठी मुंबई हायजॉक करू तर व्यवस्था उध्वस्त करू.
यावेळी दिपक गायकवाड, समता गावडे, विनोद कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली, सुत्रसंचलन प्रमोद कोरे यांनी केले प्रास्ताविक शामराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या वातावरण निर्मीतीसाठी शहरातुन मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
नागपूर, दि. 15 : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु,…
BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माढा तालुक्यातील अरण येथे रविवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अपघात झाला. या…
MH13 NEWS Network: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली. पत्रकार परिषदेतील…
BY MH13 NEWS NETWORK : सोलापूर मार्केट यार्ड मधील सर्व मोठी वाहने रस्त्याच्या सर्व्हिस रोडवर 24 तास उभे करत असल्याचे दिसून…
MH13 NEWS Network: विधानसभा निवडणुक रणधुमाळीत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टी व शिवसेनेमध्ये…
BY MH13 NEWS NETWORK : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आयोजित वरिष्ठ गट पुरूष आंतर जिल्हा स्पर्धा या दी. १२ ते…