मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट जनतेसाठी खुले

MH13NEWS Network

कंदलगाव येथे १८ एकर जागेवरील देखणा प्रकल्प

मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट जनतेसाठी खुले  करण्यात आले असून कंदलगाव येथे १८ एकर जागेवरील देखणा प्रकल्प सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वैभवात निश्चितच भर टाकेल असा विश्वास कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला. स्वर्गीय नागेश करजगी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सरपंच पाटील यांच्या हस्ते वॉटर प्रकल्पाच्या यंत्रणेची कळ दाबून वॉटर पार्कचा शुभारंभ करण्यात आला,यावेळी सरपंच पाटील बोलत होते.


प्रकल्पाबाबत माहिती देताना संस्थापक कुमार करजगी म्हणाले, सोलापूरच्या जवळपास एकही अमेझमेंट किंवा वॉटर पार्क नाही. त्यासाठी सोलापूरकरांना १०० किलोमीटर अंतरावर आनंद लुटण्यासाठी जावे लागले. याचा विचार करून कामगार नेते कुमार करजगी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मंद्रूप – कामती चौपदरी रस्त्याला लागून मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सुरु केले आहे. १८  उभारण्यात आलेल्या वॉटर पार्कमध्ये अनेक सोइ उपलब्ध करून  आहेत.

वॉटर स्पोर्ट्स,रेन डान्स ,नौकाविहार,वॉटर गेम आदींचा आनंद लुटता येणार आहे. सोबत अम्युझमेंट पार्कची मज्जा देखील अनुभवास मिळणार आहे. लहान मुलांसाठी विविध राइड्स,मोठ्यांसाठीसुद्धा थरारक राइड्स उपलब्ध आहेत. बांबू हाऊस बरोबरच पंचतारांकित रूम्स याठिकाणी राहण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध कंपन्या,संस्था आदींना या  ठिकाणी बैठका व हॉलदेखील सुसज्ज ठेवण्यात आला आहे. यामध्ये एकदिवसीय शिबीर,कार्यशाळा,सेमिनार घेता येणार आहेत. या  सर्वांसोबत निसर्गोपचार केंद्रदेखील उभारण्यात आले आहे.


या ठिकाणी विविध  आजारांवर उपचाराची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोलापूर शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असणारा हा वॉटर पार्क सोलापूर शहर आणि जिल्हावासीयांसाठी एकप्रकारची पर्वणीच ठरणार आहे. कुटुंबियांसमवेत रविवारची सुट्टीची मजा बालगोपाळांसह लुटता येणार आहे. याशिवाय थ्रीडी गेम्स,थियेटर ,रेल्वे गाडी आदींचासुद्धा आनंद लुटता येणार आहे, असेही कुमार करजगी यांनी यावेळी बोलताना म्हणाले .
यावेळी कंदलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ जोकारे ,यशराज करजगी योगीनाथ चिडगुंपी, सुरेंद्र कर्णिक,डी.व्ही.शेटे, राजाराम चव्हाण ,संतोष हसापुरे, उमेश बने, गणेश पोतदार,बाळासाहेब शेतसंदी,मुंजप्पा कोले, अशोक कोले,तुळजाराम नरोटे,अमर पाटील,चंद्रकांत निंगफोडे,ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील,आनंद कोले, सुधाकर जोकारे आदी उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

11 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago