‘बॅलेट’ पेपरवर मतदानासाठी ‘मनसे’ करणार मतदार जागृती

आज पासून सुरू होतेय मोहीम

0
52

ईव्हीएम मशीन ऐवजी येत्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात यासाठी 21 ऑगस्ट रोजी मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी मनसैनिकांनी मतदारांनाही याबाबत जागृत करावेत आणि त्यांच्याकडून फॉर्म भरून घ्यावेत असे आवाहन मनसेचे अध्यक्ष व सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केले.

सोमवारी मुंबई येथील कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने येत्या 21 ऑगस्ट रोजी मुंबई येथे आयोजित महामोर्चाचे नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

यावेळी सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे, जनहित चे प्रदेश अध्यक्ष किशोर शिंदे, सरचिटणीस हेमंत गडकरी,वर्धा जिल्हा अध्यक्ष अतुल वंदिले ,अशोक तावरे, प्रशांत गिड्डे, विनायक महिंद्रकार, बंडू कुटे,प्रशांत इंगळे, शशिकांत पाटील, आप्पा करचे, जैनुद्दीन शेख,राहुल आक्कालवडे ,कुणाल उगले, दिलीप रामेडवार,विपुल पाटील,जितेंद्र पाटील, आबा ढवळे, वैभव काकडे,श्रीराम बादडे,सचिन पोटरे ,यांच्यासह इतर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पिंजून काढून करणार मतदार जागृती

आज मंगळवार पासून प्रत्येक मतदारसंघात मतदाराच्या घरी जाऊन मतपत्रिकेवरच मतदान झाले पाहिजे, यासाठी फॉर्म भरून घ्यायचे आहेत. सर्व जनतेच्या मनात बॅलेट पेपर वरच मतदान झाले पाहिजे,अशी भावना आहे.त्यामुळे प्रत्येक मतदारांशी चर्चा करून अर्ज भरून घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. त्यानुसार आम्ही कामास सुरुवात केली.

दिलीप धोत्रे,

प्रदेशाध्यक्ष ,सहकार सेना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here