Categories: राजकीय

अबब! भाजप आमदाराची विद्यार्थी नेत्याला चक्क १ कोटींची अब्रूनुकसानीची नोटीस

MH13 NEWS NETWORK:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी महसूल मंत्री व विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी वकील मुलीविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केल्याची घटना ताजी असतानाच चक्क एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी वकिलामार्फत विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांना पाठविल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.

सोलापुरातील एका फार्मसी महाविद्यालयातील ठाकूर नावाच्या नापास विद्यार्थ्याला पास केले असून तो एका बड्या राजकीय नेत्याचा नातलग असल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेद्वारे केला होता. याप्रकरणात काहीही संबंध नसताना आपले नाव घेतल्याने आपली नाहक बदनामी झाल्यामुळे फौजदारी न्यायालयात खटला भरून दिवाणी न्यायालयात एक कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची नोटीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी वकिलामार्फत गणेश डोंगरे यांना पाठविल्याने जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर हे पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सदस्य तसेच पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य आहेत.

सोलापुरातील वि. गु. शिवदारे या फार्मसी महाविद्यालयातील द्वितीय व तृतीय वर्षातील एका विद्यार्थ्याला पास करण्यासाठी त्याचे एकूण तीन विषयांचे गुण वाढवले असून, गुण वाढवण्यासाठी “ईआरपीएस’ या प्रणालीमध्ये एमफडणवीस या लॉगिन आयडीचा वापर केल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसने केला आहे. या प्रकाराची “एमकेसीएल’मार्फत चौकशी व्हावी याबरोबरच चौकशी पूर्ण होईपर्यंत कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख यांनी राज्यपालांना दिले आहे त्यावर राज्यपाल काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार परिषदेत आमदार ठाकूर यांचे नावच नाही – डोंगरे
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या गैरकारभारावर प्रकाश टाकण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यामध्ये भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाचा स्पष्ट व अस्पष्ट असा उल्लेख केला नाही. पुढील दोन दिवसांत त्यांच्या नोटीसीला उत्तर दिले जाईल.
– गणेश डोंगरे, जिल्हाध्यक्ष, विद्यार्थी कॉंग्रेस, सोलापूर

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

47 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago