Categories: राजकीय

गोल्डन गँगचे डिपॉझिट जप्त करू ; म्हेञे हाच आमचा पक्ष..ते देतील तोच आदेश मान्य.!

महेश हणमे,MH13NEWS

आमदार सिद्धाराम म्हेत्रे हाच आमचा पक्ष असून ते देतील तो आदेश मान्य आहे. साहेब आपण आदेश द्या.! गोल्डन गॅंग टोळीचे डिपॉझिट सुद्धा जप्त करू ,अशा प्रकारचा सूर बुधवारी अक्कलकोट येथील आ.सिद्धाराम म्हेत्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत दिसून आला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार म्हेत्रे यांनी वागदरी रोडवरील टिनवाला मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या समर्थकांच्या बैठकीत अनेकांनी आपापली मत मांडली.

कोणत्याही पक्षात जावं.निवडून आणण्याची जबाबदारी आमची

म्हेत्रे परिवारावर २००९ मध्ये खोटा गुन्हा दाखल केला.त्यावेळी असलेल्या विधानसभा निवडणुकीत मुद्दामच त्रास दिला. तेव्हा राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा कोणीही मदतीला आलं नाही. त्यामुळेच पराभव झाला. तेव्हापासून तालुका १० वर्ष विकासापासून पिछाडीवर गेला आहे. या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आ. म्हेत्रे यांनी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपा,राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा,वंचित आघाडी यासह कोणत्याही पक्षात जावं.निवडून आणण्याची जबाबदारी आमची असेल.!
शंकर म्हेत्रे,
तालुका अध्यक्ष,काँग्रेस कमिटी

तालुक्याचा विकास करण्यासाठी म्हेत्रे यांच्या पाठीशी

कै.आनंदराव देवकते,कै.वि.गु.शिवदारे, कै. ब्रह्मदेव माने यांच्या काळात विचाराचं राजकारण केले जात होते.मात्र सध्याचं राजकारण जाती अन् धर्मावर चालू आहे. त्यामुळे कोणाचाच एकमेकांवर विश्वास उरलेला नाही.म्हणून तालुक्याचा विकास करण्यासाठी म्हेत्रे यांच्या पाठीशी उभे राहू.
बाळासाहेब शेळके,
काँग्रेसचे माजी जिल्हाअध्यक्ष

आ.म्हेत्रेंचा निर्णय शिरसंधान
निवडणुका पुरता राजकारण करणारे अनेकजण आहेत.पण सर्व समाज घटकाला भेदभाव न करता आ. म्हेेत्रे सोबत घेतात.मानव जातीच्या महत्त्वाच्या अशा सोळा संस्काराला (जन्मापासून ते मृत्यूपर्यंत) या सारख्या कार्यक्रमाला ते हजर राहुन कार्यकर्त्यांसह सर्व सामान्य नागरिकांची आस्थेने काळजी घेणारे आ.म्हेत्रे हा एकमेव व्यक्ती आहेत.त्यांनी जो निर्णय घेईल,तो आम्ही सर्व जण शिरसंधान मानू.
एजाज मुतवल्ली,
मुस्लिम समाज अध्यक्ष, अक्कलकोट.

भाजपाच्या वाटेवर असणारे आ.म्हेञे नेमका कोणता डाव टाकणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी श्री.सातलिंगप्पा म्हेञे,अक्कलकोट चे अामदार श्री.सिध्दाराम म्हेञे,मा.श्री.शंकर म्हेञे, सभापती श्री.मल्लिकार्जुन पाटील, माजी उपसभापती श्री.महेश जानकर, श्री.शिवशरण शिवदारे, श्री.बाळासाहेब शेळके, उपसभापती मा.श्री.प्रकाश हिप्परगी, माजी उपसभापती .श्री.सिध्दार्थ गायकवाड, माजी नगराध्यक्ष श्री.अशपाक बळोरगी, श्री.महेश इंगळे, श्री.दिलीप बिराजदार , सरपंच श्री.व्यंकट मोरे, .श्री.इजाज मुत्तवल्ली, श्री.बाबासाहेब पाटील, अाजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, अाजी-माजी पंचायत समिती सदस्य, अाजी-माजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व अक्कलकोट तालुक्याचे पदाधिकारी, मतदार संघातील ज्येष्ठ नागरिक, नागरिक, हजारो युवक या बैठकीस उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

Breaking -ट्रॅव्हलर, सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग

धक्कादायक मोहोळ विजापूर हायवे वरील घटना मोहोळ विजयपूर महामार्गावर येथे विजयपूर कडे व्हीआयपी सुटकेस घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग…

1 day ago

राज्यासाठी ठाकरे सरकारची पंतप्रधान मोदींकडे ही ‘मागणी’

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती नवी दिल्ली, दि. 21 : वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा…

2 days ago

माजखोर ‘वारिस’ तुझे 15 कोटी लोक घेऊन….

MH13NEWS Network एमआयएमचे वारिस पठाणच्या प्रतिमेला 'प्रहार'ने काळ फासलं आम्ही १५ कोटी मुस्लिम १३५ कोटी हिंदूवर भारी असल्याचे वादग्रस्त विधान…

2 days ago

‘यल्लोरु अप्पा बेडर शिवभक्त कन्नप्पा’…जयंती भक्तिभावात…

MH13NEWS Network महाशिवरात्री म्हणजेच सृष्टी दिन याच दिनी भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे अख्यायिका मध्ये…

2 days ago

#शिवमय : महाशिवरात्रीनिमित्त कुडल घाटावर ‘भक्तीसंगम’

शिवभक्तांच्या गर्दीने मंदिर फुलले सोलापूर, दि.21 फेब्रुवारी - महाशिवरात्रीनिमित्त कुडल संगम (दक्षिण सोलापूर) येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.…

2 days ago

या पुढे…राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज.!

मुंबई, दि. १७ राज्यातील उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून याविषयी चर्चा…

2 days ago