हे माझं ‘साकडं’ ; ५ किलोमीटर अनवाणी जाऊन प्रणिती शिंदेंनी रूपाभवानीचं घेतलं दर्शन

0
640

By-MH 13 News,network

सोलापूरसह जिल्हा परिसरात प्रसिद्ध असलेल्या श्री रुपाभवानी मातेच्या दर्शनासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी पहाटे पाच वाजताच घर सोडलं आणि तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन प्रती तुळजाभवानी मातारुपी असणाऱ्या श्री रूपा भवानी मातेचे दर्शन घेतलं.

संपूर्ण राज्यासह देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. अनेक जण भाविक संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात. काहीजण नऊ दिवस अनवाणी राहतात, तर हजारो महिला रोज देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जातात.

नवरात्रात आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी श्री रुपाभवानी मातेच्या मंदिरात असते.

सोलापुरात शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आणि काँग्रेसच्या उमदेवार प्रणिती शिंदे यांनी आज पहाटे तब्बल पाच किलोमीटर चालत जाऊन, रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं.

‘जनवात्सल्य’ या आपल्या निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात अनवाणी पायाने जाऊन दर्शन घेतलं. आज सोमवारी पहाटे पाच वाजता आमदार प्रणिती शिंदे आपल्या मोजक्या महिला कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या होत्या.

सर्व सोलापुरातील माझ्या सर्व बंधू भगिनींच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे त्यांचे आयुष्य सुखासमृद्धीचे जाऊ दे अशी प्रार्थना केली.

दर्शन घेतल्या नंतर प्रणिती शिंदे म्हणाल्या,”देवीच्या दर्शनाने एक वेगळी ऊर्जा मिळते. नवरात्रीत सर्वत्र देवीचा जागर असतो, पूजा-अर्चा करतात आणि देवीकडे प्रार्थना करतात.प्रत्येक महिलांमध्ये देवीचं रूप असतं ,आज आम्ही सगळ्या एकत्र येऊन रुपाभवानी देवी चरणी माथा टेकला आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, आई रूपा भवानी तुझी कृपा सर्वांवर असू दे आणि माझ्या सर्व भावांना विनंती की जसे तुम्ही स्त्रीशक्तीचा जागर करता पूजाअर्चा करता पण हे विसरू नका, प्रत्येकाच्या घरी एक देवीच्या स्वरुपात आई असते, एक मुलगी असते, एक बहीण असते, व पत्नी असते तिला पण तेवढाच मान सन्मान द्या हीच खरी देवी वरची श्रद्धा असेल असे मला वाटते. माझ्या सगळ्या माता-भगीनीच्या माझ्या सर्व समाज बांधवांचे सर्व सोलापूरकरांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि त्यांचे आयुष्य सुखाचे आणि समृद्धीचे जाऊ द्या अशी आई रुपाभवानी चरणी प्रार्थना केली आहे अशी भावना या वेळी प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here