एम.एल. युवक प्रतिष्ठान वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

महेश लोंढे मित्रपरिवाराचा उपक्रम

0
39

by MH13News,network

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून व शहर युवक काँग्रेस सरचिटणीस महेश पैलवान लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी आपले विचार व्यक्त करताना काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले की आजचे विध्यार्थी हेच उद्याचे भारताचे शिलेदार असून सक्षम राष्ट्र निर्मितीसाठी उत्तम शिक्षण महत्वाचे असून काही विद्यार्थाना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेताना अडचणी येत असतात म्हणून आपल्या वाढदिवस निमित्त एम. एल. युवक प्रतिष्ठान चे महेश लोंढे यांनी विद्यार्थाना दप्तर, पुस्तक संच, वह्या, पेन आदी शैक्षणिक साहित्य वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे त्यांचे हे कार्य गौरवास्पद आहे.

कार्यक्रमाचे आयोजन एम. एल. युवक प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिवहन समितीचे सदस्य तिरूपती परकीपंडला, योगेश मर्गम, मनोज लोंढे, शिवा सलगर, शरद गुमटे, मल्लू सलगरे, सचिन हेगडे, निखिल पवार, प्रसाद पवार, आकाश कदम, हर्षल कुर्ला , शामभाऊ कबाडे, नवाज शेख, विकास डोलारे, दिपक भोसले, अमित कांबळे प्रफुल्ल फडतरे, आप्पासाहेब पवार, पृथ्वीराज मोरे, बाळू कदम, संजय शिंदे, दिपक जाधव, शंभू शिंदे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरूपती परकीपंडला यांनी तर आभार निखिल पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here