मायनस ३५.६६ उजनी धरण

0
6

उजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता

आजच्या दिवशी  गेल्यावर्षी उजनीची पाणीपातळी प्लस १४.९३ टक्के होती. यंदाच्या पातळीत बरीच घट दिसत आहे. अजून मे आणि जून हे दोन महिने पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने यंदा पाण्याचे संकट अधिक गडद होणार, असे जाणवत आहे.कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भीमा नदीवरील एक आवर्तन द्यायचे शिल्लक आहे. ते येत्या १५ मे रोजी सोडण्यात येणार आहे. येणाºया काळात वेळेत पाऊस न झाल्यास जुलै २०१९ नंतर पाणी पिण्यासाठी ठेवण्याची खबरदारीही यंत्रणेला घ्यावी लागणार आहे.

उजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.भीमानगर उजनी धरण सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यातच कृष्णा खोरे महामंडळाकडून पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र देऊन उजनी काठच्या भागातील पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

या सर्वांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यातील उजनी धरणाकाठी असलेले अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उजनी धरण सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १२६१.८२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा मायनस ५४०.९९ दलघमी, उजनीची टक्केवारी मायनस ३५.६६ टक्क्यांवर गेली आहे. एकूण टक्केवारी ४४.५६ तर उपयुक्त टक्केवारी १९.१० आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here