Categories: राजकीय

अनुसूचित जाती, नवबौद्धांसाठी नव्या ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी ;सामाजिक न्यायमंत्री बडोले

By-MH13 NEWS,वेब/टीम

सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी नवीन 50 शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यासाठी 262 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी श्री. बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिन दिनेश वाघमारे, समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री.बडोले म्हणाले, राज्यात सध्या शंभर निवासी शाळांपैकी 88 निवासी शाळा सुरु असून त्यापैकी 30 मुलींच्या शाळा व 58 मुलांच्या शाळा आहेत. या निवासी शाळांमध्ये 13 हजार 792विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवीन निवासी शासकीय शाळा सुरु करताना अनुसूचित जातींची लोकसंख्या          (सन 2011 ची जनगणना आभारभूत मानता), सर्वसाधारण लोकसंख्येच्या साक्षरतेचे प्रमाण, लोकप्रतिनिधींची मागणी व तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृहाची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन 50 नवीन शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही आणखी काही निवासी शाळांना मंजुरी देण्यात येईल. यात प्रामुख्याने मुलींच्या शाळांना प्राधान्य देण्यात येईल, असेही श्री.बडोले यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या निवडक वस्तींचा विकास,नवीन मुलींचे वसतिगृह, ऐतिहासिक स्थळांचा विकास या कार्यक्रमांचा उर्वरित निधी तात्काळ खर्च करावा. विभागांतर्गत येणाऱ्या महामंडळांच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. महामंडळाच्या पुढील नियोजनाचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्री. बडोले यांनी यावेळी दिले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

20 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

22 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

23 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago