Categories: राजकीय

गौरवास्पद: …मिनाक्षीताई या खऱ्या अन्नपूर्णा – आमदार प्रणिती शिंदे

MH13 NEWS NETWORK:

पूर्व भागात अल्प दरात नाश्त्याची सेवा देणाऱ्या मिनाक्षी गनगुंडी म्हणजे स्वावलंबी जीवन जगणाऱ्या अन्नपूर्णाच आहेत, असे गौरवोद्गार आमदार प्रणिती शिंदे यांनीे काढले.

पूर्व भागातील दत्तनगर येथे लहानशा टपरीवर केवळ दहा रुपयात इडली वडा, डोसा, आंध्र भजी विकणाऱ्या मीनाक्षी गनगुंडी यांच्या टपरीला आमदार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी नाश्त्याचा आस्वाद ही घेतला.

दत्तनगर बालाजी मोबाईल दुकान जवळील सौ. मीनाक्षी गनगुंडी ह्या आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून रस्त्याच्या कडेला नाश्त्याचा गाडा (अजय-आकाश इडली गृह ) टाकून घरगुती चवीचे इडली, वडा, भजी, द्वाशी स्वता बनवून या भागातील नागरिकांना अतिशय स्वस्त दरात सेवा देत आहेत. मीनाक्षी गनगुंडी या माध्यमातून स्वावलंबी होऊन यातूनच दत्त नगर झोपपट्टीत घर ही घेतले आहे. तसेच आपल्या दोन मुलांची शिक्षणाची सोय सुद्धा त्यांनी केली आहे मीनाक्षी गनगुंडी यांच्या स्वावलंबीपणाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी शाल व पुष्पहार घालून सत्कार करीत त्यांचे कौतुक केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

10 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

12 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

23 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago