Categories: राजकीय

मी पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ; सुशीलकुमार शिंदे

By-एमएच १३ न्यूज वेब/टीम

काँग्रेस पक्षातील जुन्या व जेष्ठ पदाधिकारी कार्यकर्त्यांचा स्नेह संवाद मेळावा हेरिटेज मंगल कार्यालय येथे काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या अरुणाताई वर्मा यांनी आयोजित केला होता .या ठिकाणी अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘साहेब, तुमच्यासाठी काय पण’… म्हणत येणाऱ्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर शहर अध्यक्ष प्रकाश वाले, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस माजी आमदार प्रकाश यलगुलवार, संयोजक अरुणाताई वर्मा, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अलकाताई राठोड, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी महापौर सुशिलाताई आबुटे, गटनेते चेतन नरोटे आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  म्हणाले,’ आज या स्नेह संवाद मेळाव्यात सर्व जातीधर्माचे अनेक जुने कार्यकर्ते एकत्र जमले आहेत यातील अनेक जण माझ्या राजकारणाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत सोबत आहेत तुमच्याच सहकार्याने आणि जनतेच्या जोरावर राजकारण करून आजपर्यंत अनेक मोठ्मोटठ्या पदापर्यंत पोहोचता आले. मागील लोकसभा निवडणुकीत आपले साहेब निवडून येतील असा अति आत्मविश्वास बाळगून कार्यकर्ते गाफील राहिले. त्यामुळे माझा पराभव झाला. पण शहरात आणि ग्रामीण भागात फिरताना अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा व्यक्त करत आहेत की मी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून मी जातीयवादी शक्तीला पराभूत करण्यासाठी लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे. आत्ता मात्र कार्यकर्त्यानी गाफील न राहता आपापल्या भागात पुढाकार घेऊन आपणच उमेदवार आहे असे समजून काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न करावा’.

पुढे बोलताना म्हणाले की राजीव गांधीं, इंदिरा गांधी यांनी  देशाचा विकास केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  यांच्यावर चुकीचे टीकाटिप्पणी करून बदनाम करण्याचे काम हे भाजपवाले करत आहेत पण तीन राज्यातील जनतेने भाजपला पराभूत करून उत्तर दिले आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला तसेच सत्तेवर येताच तीन राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकर्याची कर्जमाफी केली. ते मोठमोठ्ठया गप्पा मारणाऱ्या भाजपला आज पर्यंत कधीच करता आले नाही. भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन सुद्धा कारवाई होत नाही. मी आजपर्यंत जय पराभवाचे कधीच काळजी केली नाही शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करणार असल्याचे यावेळी सुशीलकुमार शिंदे  म्हणाले.

यावेळी आझम सैफन, गुलाबचंद्र बारड, विश्‍वनाथ साबळे, अनवर सैफन, भारत जाधव, नूरुद्दिन मुल्ला, पांडुरंग चौधरी, जाबीर अल्लोळी, सुभाष चव्हाण, नामदेव राठोड, यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या मेळाव्याचे प्रास्ताविक संयोजक अरुणाताई वर्मा, सूत्रसंचालन चंद्रकांत कोंडगुळे, आभार प्रदर्शन जाबीर अल्लोळी यांनी केले

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

1 hour ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

1 hour ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago