माढ्यात राबवली शहर स्वच्छता मोहीम ;माझी वसुंधरा माझी जबाबदारी…

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:
स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेअंतर्गत माझी वसुंधरा ही मोहीम माढा नगरपंचायतच्या वतीने शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करून व कै. गणपतराव साठे प्रशाला ,रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ‘माझी वसुंधरा माझी जबाबदारी’ ही शपथ देण्यात आली.

माझी वसुंधरा माझी जबाबदारी

आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे यावेळी माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मिनल साठे यांनी सांगितले. या मोहिमेत वृक्ष लागवडी बरोबर वृक्षाचे संवर्धन, वृक्ष कत्तल थांबवणे व शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी पालन करणे बंधनकारक असणार आहे. शहर व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शहरातील नागरिकांनी आत्तापर्यंत चांगले सहकार्य केले आहे. तसेच नगरपंचायतीने केलेल्या प्रत्येक आवाहनाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. यापुढेही माढा शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे. माढा शहरात कमी प्रमाणात प्रदूषण व्हावे यासाठी प्रत्येक बुधवारी आपल्या वाहनांचा शक्यतो वापर टाळून सायकलचा व पायी चालून आपली दैनंदिन कामे करावी यामुळे शहरातील प्रदुषण कमी होण्यास मदत होऊन आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. आठवड्यातून एक दिवस वाहन वापरल्याने इंधन बचती तसेच काही प्रमाणात पैशाची ही बचत होणार आहे.

त्यामुळे या माढा नगरपंचायतीच्या वतीने पाळला जाणार ‘नो व्हेइकल डे’ यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व दर बुधवारी सायकलचा वापर करून शहरांमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी मदतीचा हात नगरपंचायतला द्यावा असे माढा नगरपंचायत नगराध्यक्षा मिनलताई साठे यांनी आवाहन केले. या वेळी माझी वसुंधरा अभियानांतर्गत मोहिते नगराध्यक्षा मिनलताई साठे , मुख्याधिकारी डॉ.चरण कोल्हे, माढा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक किरण घोंगडे , उपनगराध्यक्षा लक्ष्मीबाई राऊत,माजी नगराध्यक्ष अनिता सातपुते, राहुल लंकेश्र्वर, गंगाराम पवार, सभापती सुप्रियाताई बंडगर, सिटी कोरनेटर शशांक कदम , माढा रोटरी अध्यक्ष अशोक लोंढे , माढा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रमोद गोसावी, हनुमंत राऊत, निलेश बंडगर, माढा नगरपंचायतीचे नगरसेवक व सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

9 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 day ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago