अहिल्यादेवी जयंतीनिमित्त कष्टकरी भाजीविक्रेत्या महिलांना दिली मायेची सावली

श्री दशभुजा गणपती प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

0
9

By-MH13NEWS,नेटवर्क

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 294 व्या जयंतीनिमित्त श्री दशभुजा गणपती प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील विविध चौकांमध्ये बसून उदरनिर्वाहासाठी भाजी विक्री करणाऱ्या महिलांना मायेची सावली मिळावी या उद्देशाने देविदास बनसोडे यांच्या संकल्पनेतून छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या मायेच्या सावलीत बसणाऱ्या माऊलींनी या बद्दल धन्यवाद दिले.

आदर्श आणि तत्वशिल उत्तम स्त्री प्रशासक म्हणून देशाने गौरव केलेल्या अशा या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या सर्वधर्म समभाव जपणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने गोरगरीब कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी काहीतरी करावं या हेतूने श्री दशभुजा गणपती प्रतिष्ठान च्या वतीने रस्त्या लगत भाजी विक्री करणाऱ्या कष्टकरी महिलांसाठी मायेची सावली मिळावी आणि अहिल्यादेवींचा आदर्शवत कारभार पुन्हा एकदा सर्वांच्या स्मरणात राहावा या उद्देशाने शहरातील विविध भागातील महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्री वाटप कार्यक्रमास नगरसेविका अंबिका पाटील, गीता पाटोळे,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रशांत फत्तेपुरकर ,भाजपाचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील ,राजमाता प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संतोष बंडगर यांच्या उपस्थितीत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सुशांत कांबळे, नागराज डंबरे,भारत सुरवसे, समर्थ होटकर,गणेश माने,रोशन पांढरे यांच्यासह श्री दशभुजा गणपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे सर्वसमावेशक व सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन केलेले विकासाचे कार्य कष्टकरी वर्गासाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहावे या उद्देशानेच हा उपक्रम राबविण्यात आला. रस्त्यालगत उन्हामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी भाजीविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांना मायेची सावली मिळावी आणि उन्हापासून त्यांचा बचाव व्हावा या उद्देशाने अहिल्यादेवी यांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
देविदास बनसोडे
संस्थापक अध्यक्ष
दशभुजा गणपती प्रतिष्ठान

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here