मराठा आरक्षण: याचिकांवर आज सुनावणी

By-एम एच१३न्यूज वेब/टीम

आज (बुधवारी)मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि विरोधातल्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात एकत्र सुनावणी होणार आहे. सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेल्या 16 टक्के आरक्षणानंतर मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही मराठा आरक्षणाविरोधात आणि मेगाभरतीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात मेगाभरतीपूर्वी सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करावं. शिवाय राज्यात सध्या तीन लाख कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यात मराठा समाजातील तरुणांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आधी त्यांना सेवेत घ्या, असं या सर्व कंत्राटी तरुणांचं म्हणणं आहे. त्यामुळे या याचिकेवरही आजच सुनावणी होणार आहे.

हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट

मराठा आरक्षणाला विरोध होणार हे आधीच लक्षात आल्याने मराठा आरक्षण संदर्भात लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी 30 नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात तर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात 3 डिसेंबर रोजी कॅव्हेट दाखल केलं आहे. याचा अर्थ मराठा आरक्षणाविरोधात कोणतीही याचिका दाखल झाल्यास, विनोद पाटील आणि राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोर्ट कोणताही निर्णय देणार नाही.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

1 hour ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

1 hour ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

11 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

20 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

21 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago