पंढरपुरमध्ये मंदिर समितीकडून टोप्‍यांचे वितरण

अभिनव उपक्रमाने कार्यक्रमास आली शोभा

0
6

By-एमएच१३न्यूज वेब/टीम

बहुतेक वेळा महाराष्ट्रातील मराठी माणसाची ओळख फेटा आणि टोपीवरून केली जाते. वारकरी संप्रदायात बहुतांश शेतकरी आहेत. त्यामुळे टोपी किंवा फेटा ही वारकरी संप्रदायाची ओळख बनली आहे. मात्र अलीकडच्या काळात टोपी गायब होत आहे. एखाद्या सत्‍काराच्या कार्यक्रमामध्ये फेटा मानाने घातला जातो. परंतु तो पाच मिनिटेच किंवा कार्यक्रम संपेपर्यंत डोक्‍यावर दिसतो.

या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी कल्पकतेने टोप्या मोफत देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी मंदिर समितीच्या नूतन भक्त निवास उद्‌घाटन कार्यक्रमात उपस्थित सर्व वारकरी, स्थानिक नागरिक, राजकीय -सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांना टोप्या मोफत देण्यात आल्या. त्यामुळे कार्यक्रम ठिकाणी ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त म्‍हणजेच जवळपास दोन हजार नागरिकांनी टोप्‍या परिधान केल्याचे दिसून आले.

सध्याच्या काळात सार्वजनिक जीवनातून हरवलेली टोपी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मात्र दिमाखदार डौलाने मिरवत असलेली दिसून आली. कार्यक्रमास उपस्थित सर्वांनी या टोप्या घालण्याच्या उपक्रमाचे कौतुकही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here