शेतकरी विठ्ठलच ठरला मानाचा वारकरी.!

ही तर पांडुरंगाचीच कृपा असल्याची व्यक्त केली भावना

0
2043

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल मारुती चव्हाण हे सपत्नीक मानाचे वारकरी ठरले.
श्री.विठ्ठल चव्हाण हे 61 वर्षांचे आहेत.तर त्यांच्या पत्नी
सौ.प्रयाग चव्हाण या 55 वर्षांच्या आहेत.हे दाम्पत्य मु. पो.सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर.जि. लातूर येथील रहिवासी आहेत..

श्री.चव्हाण हे मु पो सांगवी सुनेवाडी तांडाचे मागील 10 वर्षे सरपंच व सध्या गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत.सन 1980 पासून सलग वारी करत आहेत.यांना दोन मुले असून पुणे येथे नोकरीस आहेत.ही तर पांडुरंगाचीच कृपा असल्याची भावना चव्हाण यांनी व्यक्त केली.

Vitthal chavan

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री व सौ.चव्हाण यांचा शाल श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास रोषणाई करण्यात आली होती. या दिव्यांच्या रोषणाईने परिसर अक्षरश: उजळून निघाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here