Categories: मनोरंजन

आर्ची ‘मेकअप’साठी थेट सोलापुरात !

महेश हणमे 9890440480

रिंकू -चिन्मयचा ‘मेकअप’ होतोय दाखल

काही महिन्यांपूर्वी ‘मेकअप’ चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर झळकले आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरु झाली. हे पोस्टर प्रेक्षकांना संभ्रमात टाकणारे होते. यात रिंकूची दोन वेगवेगळी रूपं होती. त्यामुळे तिचा डबल रोल आहे का, याचा विचार सुरु असतानाच ‘मेकअप’चा टिझर प्रदर्शित झाला. हळूहळू या ‘मेकअप’चा उलगडा होत असतानाच हा ‘मेकअप’ अधिक गडद करण्यासाठी ट्रेलरही प्रेक्षकांसाठी दाखल झाला. वरवर पाहता हा मेकअप फक्त चेहऱ्याचा दिसत असला तरी यात मेकअपचे अनेक पैलू उलगडणार आहेत.

ट्रेलर एकदम धमाल असतानाच त्यात अनेक ट्विस्टही दिसत आहेत. एकीकडे लग्नासाठी मुले बघणारी, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे दोघींपैकी खरी पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीने हा ‘मेकअप’ का केला, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून ते चित्रपट पाहिल्यावरच सुटतील. ट्रेलरवरून हा सिनेमा जबरदस्त असणार हे नक्की. त्यासोबतच चित्रपटातील गाणीही श्रवणीय आहेत.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘गाठी गं’ हे साखरपुड्याचे गाणे प्रदर्शित झाले. प्रत्येकालाच थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला शाल्मली खोलगडे हिचा आवाज लाभला आहे. तर या गाण्यात नृत्य दिग्दर्शक विठ्ठल पाटील यांनी सर्वच कलाकारांना ठेका धरायला लावला आहे. ‘लागेना’ हे प्रेमाच्या तरल भावनेचा अनुभव देणारे हे गाणे साहिल कुलकर्णी यांनी गायले आहे. या सिनेमातले तिसरे गाणे रसिकांना सुखद धक्का देणारे आहे. नेहा कक्करने तिच्या सुरेल आवाजात ‘मिले हो तुम हमको’ ह्या हिंदी गाण्याचे मराठी व्हर्जन या चित्रपटात गायले आहे. या तिन्ही गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. आणि ग्रीन ॲपल मीडिया प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग आहेत तर केतन मारू, कलीम खान सहनिर्माता आहेत. गणेश पंडित लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांच्याव्यतिरिक्त प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ यांच्याही भूमिका आहेत. सुजॉय रॉय यांची कथा असलेला हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

46 mins ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

5 hours ago

एका ‘कॉल’ने केला असा कायापालट ;सव्वा एकरात डाळिंबाचे 20 टन भरघोस उत्पादन… वाचा सविस्तर

MH13 News Network सोलापूर जिल्ह्यातील मानेवाडी येथील शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून…

6 hours ago

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी प्रमाणपत्रे सादर करण्यास ‘मुदतवाढ’

MH13 NEWS Network विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर…

10 hours ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी आग्रही भूमिका

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी छञपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी माढ्यातील नागरिकांनी  जिल्हाधिकारी मिलिंद…

2 days ago

माढा | ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी मतदान ; सोमवारी भवितव्य…

शेखर म्हेञे / माढा प्रतिनिधी  माढा तालुक्यातील 74 गावातील ग्रामपंचायतीची निवडणूक काल 15 जानेवारीला उंदरगाव,उपळाई,…

2 days ago