Categories: राजकीय

भाजपच्या बालेकिल्ल्यात महायुती संकल्प मेळावा संपन्न

सोलापूर/प्रतिनिधी
शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या वतीने बुधवारी अथर्व गार्डन येथे महायुती संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले.
याप्रसंगी भाजप, शिवसेना, रिपाई, रासप, रायतक्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रघुनाथ कुलकर्णी, भाजप शहर अध्यक्ष विक्रांत देशमुख सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.

याकार्यक्रमाप्रसंगी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी,सुरेश पाटील, नागेश वल्याळ, नगरसेवक किरण देशमुख, राजकुमार पाटील, महापौर शोभा बनशेट्टी, बिज्जू प्रधाने, पुरुषोत्तम बरडे, मोहन डोंगरे, संजय कोळी, प्रभाकर जामगुंडे आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शहर उत्तर मतदार संघातील काँग्रेसचे सिद्धू मुनाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे व नंदू मुस्तारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केले. मी भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसणारी नाही आमची घरगुती भांडण होती ती मिटली आहेत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अनेक मोठी कामे होत आहेत. महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी चाळीस वर्षे सत्ता असूनही विकासाची कामे झाली नाहीत असा घणघणाती टिका महापौर शोभा बनशेट्टी यांनी केले.
महायुती संकल्प मेळाव्यास शहर उत्तर मतदार संघातील नागरिक, भाजप कार्यकर्ते, बुथ प्रमुख, विविध संघटना या कार्यक्रमास उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago