महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेचा सर्वसामान्यांना फटका ; धैर्यशील मोहिते-पाटील यांची टीका

MH13 News Network

महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास महाविकास आघाडीचे राज्य सरकार अपयशी ठरले आहे. प्रशासकीय पातळीवरील असमर्थतेमुळे शेतकरी, गोरगरीब जनता, मजूर, कामगार, नोकरदार व महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या निष्क्रीयतेचा फटका बसत आहे.केंद्र शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला तथापि तो आदेश सरकार यशस्वीपणे राबवत नसल्याने भूकबळी चा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारचा निषेध व्यक्त करतो अशा भावना भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्याची खासकरून सोलापूर शहरातील परीस्थिती गंभीर आणि भयावह आहे. अपूरे नियोजना, प्रशासकीय यंत्रणेतील ताळमेळाचा अभाव यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.सोलापूरातील परीस्थिती आटोक्यात न आल्यास उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याचा धोका आहे.या मायक्रो लेव्हल मॅनेजमेंटच्या कामात राज्य सरकार “फेल” झाले आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
देशातील इतर लहान मोठी राज्य केंद्र शासनाच्या मदतीने कोवीड १९ संसर्गजन्य महामारी वर प्रशासकीय ताळमेळ, यंत्रणांमधील योग्य समन्वयाने आणि दूरदृष्टीने भविष्य कालीन उपाययोजना करत महामारी आटोक्यात आणताना दिसत आहेत, तर दुसरी कडे महाराष्ट्र राज्य सरकार या आरोग्य आणीबाणीच्या काळात आपल्या अकार्यक्षमतेमुळे, केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा आणि पॅकेजेसचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यास अपयशी ठरले आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारने सुरुवात केलेली नाही. ७६००० बेड्सची गरज असताना किरकोळ उपाययोजना करून महाराष्ट्र सरकार जनतेची फसवणूक करत आहे . कोविड योद्धे म्हणून जगभर कौतुकास पात्र ठरलेल्या डॉक्टर्स नर्सेस व सर्व आरोग्य सेवक तसेच फ्रंट लाईनवर काम करणारे पोलीस दल, सुरक्षा रक्षक यांच्या आरोग्य हितासाठी केंद्राने पाठवलेले पीपीई किट्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही, हा तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरावा इतका गंभीर प्रकार आहे. या बाबतीत राज्य सरकार उदासीन आहे.
निराधार लोकांचा आधार असलेल्या श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेद्वारे मिळणारी रक्कमही राज्य शासनाने अजूनही लाभार्थ्यांना वितरित केलेली नाही, राज्यातील जनतेवर भयंकर संकट असताना महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देणारे एकही पॅकेज किंवा योजना जाहीर केलेली नाही.
स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे.
इतर सर्व राज्य विविध घटकांसाठी पॅकेज देत असताना राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवीत आहे.

राज्यातील पोलिसांची अवस्था तर अतिशय विदारक आहे. त्यांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाही. राज्यात सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाचे संकट हाताळण्यात महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले असून आरोग्य व्यवस्था पूर्णतः कोलमडली आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या उद्भवलेल्या भयंकर परिस्थितीस महाराष्ट्राला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सरकारच्या निष्क्रीययतेचा निषेध व्यक्त करतो असे भाजपा नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी म्हटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago