महाराष्ट्र पोलीस पथकाने भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात मारली बाजी

लखनऊ उत्तर प्रदेश येथे ६२ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि १६ जुलै ते २० जुलै २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र पोलीस संघाने दैदिप्यमान यश प्राप्त करुन भारत देशामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाचे नांव अग्रस्थानी आणुन देश पातळीवर नावलौकिक केले आहे.

६१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्र राज्याने अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे सर्वसाधारण
विजेतेपद पटकावल्याने संपुर्ण महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये आनंदाचे वातावरण पसरले
आहे.

सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी यांचेकडून पदक विजेत्या खेळाडूंकरीता शुभेच्छांचा
वर्षाव होत असुन सोलापूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस हवालदार इक्बाल रशिद
शेख यांनी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आज त्यांना मिळाले असुन त्यांनी अखिल भारतीय
पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये पोलीस ऑब्झर्वेशन या प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त करुन भारत
देशात प्रथम क्रमांक मिळवुन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे व महाराष्ट्र पोलीस दलाचे नांव
भारत देशात लौकिकास आणले आहे. या त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीकरीता  पोलीस
महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस दलातील उल्लेखनिय कामगिरीकरीता
पोलीस महासंचालक पदक व विशेष बक्षिस जाहीर केले.

पोलीस हवालदार इक्बाल शेख बक्कल नंबर १४६५ यांनी आजतागायत कोल्हापूर परिक्षेत्रीय,
महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये एकुण ०६ सुवर्ण, ०५ रौप्य व
०५ कांस्य पदके पटकावली. सीसीटीएनएस विभागात कामकाज करीत असतांना
सोलापूर ग्रामीण जिल्हा हा सीसीटीएनएस मध्ये अव्वल क्रमांकासह कायम आहे.
त्यांना वैयक्तीक उत्कृष्ठ कामगिरीकरीता रौप्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस
दलाकडून पोउपनि अन्वर मुजावर, पोशि प्रसाद मांढरे, पोशि गोवर्धन भोसले तसेच श्वान जॅकी
यांनी विविध विषयावरील प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. विजेत्या पोलीस कर्मचारी यांचे
तसेच महाराष्ट्र पोलीस संघातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
सुबोधकुमार जयस्वाल, पोलीस महासंचालक, म.रा.मुंबई, अतुलचंद्र
कुलकर्णी, अपर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे तसेच कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक  सुहास वारके, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस अधीक्षक, सीआयडी पुणे, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, मो. युन्नुस अत्तार, पोलीस उप
अधीक्षक (मुख्यालय), सोलापूर ग्रामीण तसेच सोलापूर ग्रामीण जिल्हयातील सर्व अधिकारी
कर्मचारी यांनी अभिनंदन करुन विशेष कौतुक केले असुन विजेते पोलीस हवालदार
इक्बाल शेख यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

10 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

13 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

23 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago