महाराष्ट्र शासनाची ‘महाॲग्रीटेक’ योजना, दीड कोटी शेतकरी जोडले जाणार

0
5

मुंबई – महाराष्ट्र शासनाने एमआरसॅक व राष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्त्रो’च्या सहाय्याने ‘महाॲग्रीटेक’ योजना सुरू केली आहे. या माध्यमातून पेरणी ते पीक काढणीपर्यंतच्या विविध टप्प्यांवर हवामान, पेरणी क्षेत्र, पीकरोग अशा विविध प्रकारच्या माहितीचा डिजिटल तंत्राने माग काढून ती माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकताच या योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय.

‘महाॲग्रीटेक’ कार्यक्रमाविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांमधील रब्बी हंगामातील पीक नियोजन, पीकनिहाय पेरणी क्षेत्र यासंदर्भात संगणकीय प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेती क्षेत्रात येणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे. राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाईल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने पीकनिहाय क्षेत्राचे मापन केले जाणार आहे. यातून पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत पिकांच्या वाढीचे सर्वेक्षण करून  शेतकऱ्यांना शेतीविषयी आवश्यक माहिती वेळीच पुरवली जाणार आहे.

या तंत्रज्ञानामुळे हवामानातील बदलासह पिकावरील रोग कीडींची वेळीच मिळणार आहे. त्यामुळे तातडीच्या उपाययोजना करणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे पीक काढणीनंतर उत्पादनाचे अनुमान काढण्यास देखील मदत होणार असून त्यामुळे शेतमालाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here