मंद्रूप तहसील कार्यालय राज्यात आदर्शवत करावे – आ. देशमुख

MH13 NEWS NETWORK:

दक्षिण  सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे नूतन अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. “जागेच्या अडचणीवर मात करत चांगल्या पद्धतीने मंद्रूप येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील अशी अपेक्षा आहेत. अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम करून हे कार्यालय राज्यात आदर्शवत करावे”, असे आवाहन माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. जयसिध्देश्वर महास्वामी हे होते. यावेळी मावळते जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रांताधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, तहसीलदार अमोल कुंभार, सभापती सोनली कडते, मंद्रूपचे नायब तहसीलदार उज्ज्वला सोरटे, अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड, मंद्रूपच्या सरपंच कलावती खंदारे,  उपसरपंच अल्लाउद्दीन शेख, काँग्रेस नेते बाळासाहेब शेळके, पंचायत समिती माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, पं. स. सदस्य महादेव कमळे, शशिकांत दुपारगुडे, शालीनी चव्हाण, हणमंत कुलकर्णी, रावजी कापसे, हणमंत पुजारी, संगप्पा केरके, भिमाशंकर नरसगोंडे, गुरण्णा तेली, गौरीशंकर मेंडगुदले, दीपाली व्हनमाने, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, विभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रूपचे पोलीस उपनिरीक्षक संदीप धांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंद्रूप येथेच त्यांची बहुतांश कामे पूर्ण होतील – जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यावेळी बोलताना म्हणाले की, या अप्पर तहसील कार्यालयामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आता सोलापुरात जावे लागणार नाही. मंद्रूप येथेच त्यांची बहुतांश कामे पूर्ण होतील. जिल्ह्याचे व तालुक्याचे कार्यालय बदल करण्यासाठी खूपच अडचण येतात.  तरीही माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे आज हे शक्य झाले.

तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाकडे आ. देशमुख यांचे लक्ष
खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी  म्हणाले, आ. सुभाष देशमुखांच्या तालुक्यातील प्रत्येक कामाकडे राज्याचे लक्ष आहे. त्यांनी तालुक्यातील  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी मंद्रुप येथे एमआयडीसीसाठी प्रयत्न केले. तालुक्यातील प्रत्येक प्रश्नाकडे आ. देशमुख यांचे लक्ष असून ते सोडवण्यासाठी शासन दरबारी ते सतत पाठ पाठपुरावा करत असतात. आ. देशमुख यांच्यासारखे अभ्यासू व्यक्तिमत्व तालुक्याला आमदार म्हणून लाभले हे भाग्याचे आहे. यावेळी खासदार महास्वामी यांनी शेतकऱ्यांनी एकमेकास सहाय्य करून आपापली कामे करावीत असे आवाहनही केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक सोलापूर जिल्ह्याचे प्रांत अधिकारी ज्योती पाटील यांनी करत आ. देशमुख यांच्या कल्पनेतून मंद्रूप अप्पर तहसील कार्यालय पूर्ण झाल्याचे सांगितले.

प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्र करणार : आ. देशमुख
दक्षिणच्या अनेक गावामधील  अनेक नागरिकांच्या शिधापत्रिका खराब असून त्यांना नवीन शिधापत्रिका देण्याचा प्रयत्न करावा, शेतकऱ्यांचे शेतातील रस्त्यासाठी वाद मोठ्या प्रमाणात असून ते  सोडण्यासाठी प्रयत्न करावे, येथील एम. आय. डी. सी. च्या जागेचे  भूसंपादन पूर्ण करावे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज व पाणी मिळाल्यास शेतकरी समाधानी राहतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करत तालुक्यातील प्रत्येक गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रत्येक गावात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा  मानस असल्याचे सांगितले. तहसीलदार उज्वला सरोटे यांनी तालुक्यातील शाळाही डिजिटल व सुसज्ज करून घेण्यासाठी प्रयत्न करावे, जेणेकरून तालुक्यातील खाजगी शाळेकडे वाढलेला ओढा हा जिल्हा परिषद शाळेकडे येईल अशी अपेक्षाही व्यक्त केली.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इफेक्ट ; ससेहोलपट थांबली ,आता…जन्म- मृत्यू दाखले महापालिकेत मिळणार ,आदेश जारी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

1 min ago

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

9 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

1 day ago