निर्णय झाला | सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून कडक संचारबंदी लागू … वाचा सविस्तर

MH13 news Network

सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच काही तालुक्यांमध्ये दहा दिवसाची संचार बंदी लागू करणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शनिवारी संध्याकाळी सांगितले.
सोलापूर शहराला लागून जी काही गावे आहेत, ज्यामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणी कडक संचारबंदी लागू करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले
याबाबत सविस्तर आदेश रविवारी अथवा सोमवारी काढण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सोळा तारखेच्या मध्यरात्रीपासून 26 तारखेपर्यंत संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल
असे महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट सांगितले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आयुक्त म्हणाले की,
सर्व किरकोळ दुकाने आणि किराणा दुकाने पूर्णतः बंद राहतील. भाजीपाला विक्री बंद असणार आहे. दूध विक्रीसाठी फक्त तीन तासासाठी सूट देण्यात आली आहे
दूध विक्रेत्यांनी घरपोच दूध विक्री करणे बंधनकारक असणार आहे. लोकांनी दुध घेण्यासाठी बाहेर पडायचे नाही.
सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दूध विक्रीस परवानगी देण्यात आली आहे.
शहरातील सर्व हॉस्पिटल सुरू असतील. त्याच्याशी निगडित असणारे औषधाची दुकाने सुरू राहतील.
कोव्हिड संदर्भात असणारे तसेच काही शासकीय कार्यालय सुरू असतील. इतर शासकीय कार्यालय व खाजगी कार्यालय पूर्णतः बंद असतील.
सोलापूर शहरातील शासकीय( पोलिसांचे) पेट्रोल पंप फक्त सुरू राहतील.
एलपीजी गॅस होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील
ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.
ही बातमी सतत अपडेट होत राहील…

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

41 mins ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

57 mins ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

4 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

6 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago