लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network

कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक त्याला प्रतिसाद देत नाहीत. वेगवेगळी कारणे सांगून मोकाट फिरणाऱ्यांना आज सोलापूर शहर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
आज सकाळी सात वाजल्यापासूनच पोलिस अत्यावश्यक कारणाशिवाय विनाकारण रस्त्यावरबाहेर पडलेल्या नागरिकांवर कडक कारवाई करीत असल्याचे दिसून येत आहे .

Lockdown Vehicle 1

सोलापूर शहरातील काही नागरिकांनी अजून ही लाॅकडाऊनला गांभीर्याने घेतले नाही हे मागील 7 -8 दिवसांत दिसून आलं होतं.90 टक्के लोक संचार बंदीचे प्रामाणिकपणे पालन करत होते तर काही नागरीक व युवक अकारण रस्त्यांवर दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरताना दिसत होते.
आज सकाळीच पोलिसांकडून लाॅकडाऊन न पाळणार्‍या अशा नागरिकांना सातरस्ता चौक, सरस्वती चौक,अक्कलकोट रोड, हैदराबाद रोड,विजयपूर रोड या ठिकाणी अडवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून आले. शहरातील प्रमुख चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.जागोजागी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी धारकांच्या गाड्या थेट जप्त करण्यात आल्या.
लाॅकडाऊन नागरिकांच्या भल्यासाठीच आहे. राज्यात व देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मिडीया मधून सर्व माहिती मिळत असतानाही काही बेपर्वा युवक व नागरीक आम्हाला कोरोना होणारच नाही या अविर्भावात रस्त्यावर फिरताना तसेच सोशल डिस्टेन्सींगचे बारा वाजवताना दिसत आहेत.


अशा गैरप्रकारामुळे सोलापूरवर कोरोनाचे महासंकट ओढावू शकते. त्यामुळे लाॅकडाऊनचे 100% पालन करण्यासाठी पोलिसांच्या या ॲक्शन मोडचे सुजाण नागरिकांनी स्वागत केले आहे.

सात रस्ता परिसरात 55 दुचाकी तीन चार चाकी एमआयडीसी एरिया 230 मोटरसायकलसह
जेलरोड पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन ,विजापूर नाका पोलीस स्टेशन, सलगर वस्ती पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास 630 दुचाकी आणि 17 चार चाकी गाडी जप्त करून काही शहर पोलिस मुख्यालय व नार्थकोट मैदानावर लावण्यात आल्या आहेत

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

आजपर्यंत 394 झाले ‘बरे’ तर 467 जणांवर ‘उपचार’ सुरू ; आजचे 84 बाधित ‘या’ भागातील…

MH13 NEWS Network  दिवसेंदिवस वेगाने वाढणारी सोलापुरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सोलापूरकरांच्या चिंतेत भर घालत आहे.…

4 hours ago

धक्कादायक : आज सोलापुरात वाढले 84 बाधित ,5 मृत तर एकूण संख्या 949

MH 13 NEWS Network आज जिल्हा प्रशासनाने रविवारी सायंकाळी दिलेल्या माहितीनुसार तब्बल 84 जणांचे रिपोर्ट…

5 hours ago

‘कैद्यां’च्या कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, दिल्या या ‘सूचना’…

MH13 NEWS Network देखभाल चांगल्या प्रकारे करा : जिल्हाधिकारी शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरला दिली…

5 hours ago

शासन आदेशानुसार लॉकडाऊन 5.0 मध्ये राज्यात काय सुरु?

MH13 NEWS Network  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपर्यंत लॉकडाऊन पाच असणार आहे.याबाबत केंद्राने त्यानंतर आता महाराष्ट्र…

6 hours ago

गृहमंत्र्यांनी केली टोळधाड नुकसानीची पाहणी

टोळधाडीपासून बचावासाठी कृषी विभागाने उपाययोजना करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश मुंबई /नागपूर, दि.31 :…

9 hours ago

ग्रामीण भागात होतोय शिरकाव ;बार्शी तालुक्यात रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

MH13NEWS NETWORK सोलापुरातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा कहर चिंता वाढवत आहे. बार्शी तालुक्यात त्याचा…

9 hours ago