Lockdown :सोलापूर शहरातील लॉकडाऊन आधीप्रमाणेच !

MH13 NEWS Network

आज 17 मे ला राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतलाय. जवळपास 2 महिन्यापासून सर्व बंद आहे. चौथ्या लॉकडाउनमध्ये बाजारपेठ, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, मद्यविक्रीसह अन्य व्यवसाय सुरु होतील, ही आशा फोल ठरली आहे. तिसऱ्या लॉकडाऊन प्रमाणेच चौथाही लॉकडाऊन असेल, त्यात कोणताही नवा बदल करण्यात आला नसल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले आहे.

दरम्यान दूध विक्री, भाजीपाला विक्रीसह किराणा दुकानांना दिलेली वेळ कायम ठेवण्यात आलीय. राज्य सरकारने आज पाठवलेल्या लेखी आदेशानुसार राज्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
केंद्र सरकारनेही चौथ्या लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक सूचना पाठविल्या असून त्यातील बदल आणि शहरातील सर्व परिस्थिती पाहून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही पोलीस आयुक्त शिंदे यांनी स्पष्ट केला आहे
शहरात कोरोनाचा प्रसार झाल्याने ग्रीन झोन ते रेड झोन असा वेगाने प्रवास घडला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विषाणूचा विळखा वाढू नये, याची खबरदारी घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पूर्वीच्या आदेशात तारीख वगळता अन्य कोणताही बदल केलेला नाही.

आजच्या राज्य सरकारच्या आदेशानुसार 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढला आहे. त्यानुसारच शहरात अंमलबजावणी करण्यात येईल. पूर्वीच्या आदेशा प्रमाणेच नवे आदेश काढण्यात आले असून कोणताही व्यवसाय व दुकाने नव्याने सुरू होणार नाहीत. केंद्र सरकारच्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या असून त्यातील महत्त्वाच्या सुचनांनुसार शहरात काही बदल करता येतील का, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
– अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, सोलापूर

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

17 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago