Categories: राजकीय

सुभाष देशमुखांना लिंगायत समाजाचा जाहिर पाठिंबा

सोलापूर,प्रतिनिधी
अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन लिंगायत समाजाचा दक्षिण सोलापूर विधानसभेचे भाजप, शिवसेना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांना जाहीर पाठिंबा असल्याचे पत्र देऊन सत्कार केला.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाभिमुख कार्यप्रणाली आणि सोलापूर जिल्हयासाठी सुभाष देशमुखांचे लोकाभिमुख कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी राष्ट्रीय संघटना अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम, रयतक्रांतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देत त्यांचा जाहिर प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधीचे पत्र पदाधिकाऱ्यांनी सुभाष देशमुख यांना देऊन, दक्षिण सोलापूर परिसरातील विकास कामे व रोजगार संबंधींच्या मागण्या येत्या काळात पूर्ण करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख गजानन हिरेमठ, बाबुराव घुगे, माजी मुख्याध्यापक पंचाक्षरी स्वामी, प्रिया स्वामी, धनश्री स्वामी, वैशाली टेंगळे, दिनेश गजभार, तिपय्या हिरेमठ व पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत देखील सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी लिंगायत समाजाचा खारीचा वाटा आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘या’ तालुक्यातील लोकांना तब्बल 1 कोटी 32 लाखांचा चुना

MH13NEWS Network लोक आशेवर जगतात हे जरी मान्य केले तरी अति हव्यासापोटी लोक स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात, याचा प्रत्यय…

3 hours ago

धक्कादायक : प्रजासत्ताकदिनी ‘येथील’ शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

MH13NEWS Network आजच्या प्रजासत्ताक दिनी एक धक्कादायक प्रकार पंढरपुरातील शासकीय कार्यालयासमोर घडला आहे. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पंढरपुरातील शेतकऱ्याचा जीव…

10 hours ago

थरारक : पंढरपूरच्या भाळवणीत गोळ्या घालून खून

MH13NEWS Network पंढरपूर तालुक्यात आज एक धक्कादायक घटना घडली आहे.तालुक्यातील भाळवणी गावात विश्वास उर्फ बापू भागवत यांची गोळ्या घालून हत्या…

11 hours ago

सोलापुरात आजपासून ‘येथे’ मिळेल ‘शिवभोजन’

MH13NEWS Network पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचे उद्घाटन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज शिवभोजन योजनेचे उद्घाटन करण्यात…

11 hours ago

शहरास बनवूया धार्मिक पर्यटन स्थळ ; महापौरांनी प्रजासत्ताक दिनी दिला विश्वास

MH13NEWS Network आजच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार…

15 hours ago

वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

MH13NEWS Network श्री वीरतपस्वी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर…

1 day ago