लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) –

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला. लगभग ११००० दिव्यांच्या दिपोत्सवात उजळलेले भक्त निवासाचे नयन मनोहरी दृष्य डोळ्यांचे पारणे फेडणारे व लक्षवेधी ठरले. या दिपोत्सवाचे शुभारंभ मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे व ब्रम्हांड नायक चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश गोवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी द्वापार युगापासूनच हिंदू धर्मात दिपोत्सवास मानाचे स्थान आहे.

मानवी जीवनातील अंधकार दूर होवून जीवनात नवचैतन्य निर्माण होण्याकरीता हा दिपोत्सव पुर्वापार परंपरेनुसार साजरा होत आला आहे. दिपावली व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आजही राज्यभरातील अनेक भाविक येथे एकत्र येवून जीवनातील अंधकारमय विचारसारणीवर मात करून जीवनात नवचैतन्य प्राप्त करण्याकरीता या दिपोत्सवाच्या माध्यमातून स्वामींचे आशिर्वाद घेवून खऱ्या अर्थाने जीवन सुख समृध्द करून घेतात असे भावोद्गार व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विजयकुमार कडगंची, राजेश गोवर्धन, संजय पाठक, महादेव तेली, चंद्रकांत गवंडी, शिवशरण अचलेर, रवि मलवे, गिरीश पवार, मल्लीनाथ बोधले, रमेश घोसले आदींसह उस्मानाबाद येथून पायी चालत आलेले अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी रेशनकार्ड धारकांना वितरण

अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती       सोलापूर, दि.7: सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून…

2 hours ago

बदल घडतोय | 84 हजार 602 कोरोनाबाधित रुग्ण बरे ; सोलापुरातील 6 हजार 323…

पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले  विभागात कोरोना बाधित…

2 hours ago

दिलासादायक | एकाच दिवशी 189 कोरोनामुक्त ; 43 पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 12…

5 hours ago

सोलापूर |’या’ भागात वाढले 291 ‘पॉझिटिव्ह’ बरे झाले 163 ; आठ जणांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस…

7 hours ago

वडाळ्यात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन

सोलापूर (प्रतिनिधी)  अयोध्येत बुधवारी  श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत  असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून  वडाळा (ता.…

1 day ago

तरुणांच्या पुढाकाराने बापुजी नगर कोरोनापासून नियंत्रित- कामिनी आडम

प्रभाग क्रं 13 बापूजी नगर मध्ये रॅपिड अँटीजेन तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोविड 19…

1 day ago