‘त्या’ एकवीस खत दुकानांचे परवाने निलंबित ; कृषी विभागाची कारवाई

कृषी सेवा केंद्र चालकांना अनुदानित खत पॉस मशिनवर नोंदणी करून विकणे बंधनकारक आहे, काही केंद्र चालकांनी याचा भंग केला असल्याने जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्रांचे परवाने 10 दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.

शासन अनुदानित खतांची विक्री करीत असताना शेतकऱ्यांना पॉस  मशिनवर अंगठ्याचा ठसा नोंदवून खते मिळत होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अंगठा नोंदविण्याऐवजी आधार क्रमांक पॉस मशिनवर नोंदवून खते देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. काही कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना खते देताना त्यांच्या आधार क्रमांकाऐवजी इतरांच्या नावाने पॉस मशिनवर नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. खतांच्या वितरणामध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही, मात्र पॉस मशिनवर नोंदणी व्यवस्थित न केल्याने 21 कृषी सेवा केंद्र चालकांचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठवला होता. त्यानुसार 21 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती श्री. माने यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील सात, दक्षिण सोलापूर-दोन, माळशिरस-एक, बार्शी-एक, माढा-पाच, उत्तर सोलापूर-1 आणि मंगळवेढा तालुक्यातील चार परवाने निलंबित केले आहेत.श्री.गुरुदत्त शेती सह.संस्था पंढरपूर,सोमेश्वर कृषी सेवा केंद्र द.सोलापूर,राहुल अग्रो एजन्सी-माळशिरस,सिद्धार्थ कृषी केंद्र-बार्शी,श्री.रोकडलिंग कृषी केंद्र -पंढरपूर
,ओम अग्रो एजन्सी-माढा,शितल कृषी सेवा केंद्र -पंढरपूर,यश अग्रो एजन्सी-उ.सोलापूर,शिवशंभो कृषी सेवा केंद्र -मंगळवेढा,शेती बीज भांडार -माढा,एम.ए.कृषी सेवा केंद्र-पंढरपूर ,बळीराजा आदर्श शेती भांडार -पंढरपूर,सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र-मंगळवेढा,श्री एजन्सी -माढा,मायक्का कृषी सेवा केंद्र द.सोलापूर,श्रीराम कृषी केंद्र -पंढरपूर,सुदर्शन कृषी केंद्र -मंगळवेढा,पांडुरंग कृषी केंद्र -माळशिरस,सुमित कृषी भांडार- माढा,मुकुंद कृषी भांडार -माढा

शेतकऱ्यांनी कोणतेही अनुदानित खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्रांकडे आपले आधार क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. दर महिन्याला प्रत्येक तालुक्यातील सर्वात जास्त खते खरेदी करणाऱ्या खरेदीदारांची शहानिशा होणार असून यामध्ये त्रुटी आढळल्यास संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago