Categories: राजकीय

लाडक्या नेत्याला मंत्रिपद मिळावे! चक्क पवारसाहेबांनाच पत्र! प्रचंड व्हायरल…

MH13 NEWS NETWORK:

सरकार स्थापन झाल्यानंतर आता चर्चा आहे ती कोणत्या नेत्याची मंत्रीपदी वर्णी लागणार. अशावेळी आपल्या लाडक्या नेत्याला मंत्रिपद मिळावे यासाठी कार्यकर्तेच कामाला लागले तर नवलच म्हणावे लागेल. सध्या लाडक्या नेत्याला मंत्रिपद मिळावे यासाठी शरद पवार यांना लिहिलेलं हे पत्र! प्रचंड व्हायरल होत आहे.

आदरणीय साहेब,
नमस्कार,
साहेब आजवर वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना-नातवंडांना आपल्या बद्दल सांगायचे पण आज त्या सर्व मुलां-नातवंडांनी व उभ्या अखंड महाराष्ट्राने आपले राजकारण आणि आपली चाणक्य नीती पहिली. त्यासाठी मला तुकाराम महाराज यांच्या अभंगा मधील एक वाक्य आठवले-

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तेंचि रूप ॥

उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥

तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तोचि माझा सखा पांडुरंग॥

साहेब, ज्या सत्ताधारी मंडळींनी राष्ट्रवादी संपवणार असा पावित्रा उचलला होता व त्यांना आपल्यातीलच काही नेते मंडळींनी आपली साथ सोडून त्यांना मदत पुरवली अश्या परिस्थितीत आपण स्वतः मैदानात उतरून तो पवित्रा मोडीत काढला. साहेब, हे तुम्हीच करू शकता असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना होता. ज्यांना आपण भरभरून दिले ते मात्र अडचणीच्या काळात पक्षाला व आपल्याला सोडून गेले पण पंढरपूर शहरात व तालुक्यात काम करत असताना ज्या ज्या वेळी मोठे कार्यक्रम आम्ही घेतले त्या त्या वेळी आमदार भारत नानांनी केवळ आपल्या प्रेमाखातर आमच्या सारख्या फाटक्या कार्यकर्त्यांना नेहमीच आर्थिक बळ देऊन पक्ष मोठा करण्यास मदत केली, प्रत्येक वेळी नाना म्हणायचे भले माझा पक्ष वेगळा असेल पण साहेबांवर माझे प्रेम होते आहे आणि कायम राहणार, त्यामुळे नानांनी नेहमी पक्षाला मदत केली आणि आज तर आपल्या पक्षाचे विजयी उमेदवार ही झालेत.

साहेब, मी आजवर पंढरपूरच्या पांडुरंगा कडे काहीच मागितलं नाही कारण पंढरपुरात जन्म मिळणे हेच खूप भाग्याचे आहे पण माझ्या विठोबा जवळ मी या विधानसभा निवडणुकीत एक साकडे घातले होते राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकार स्थापन होण्यासाठी माझा नेता माझे दैवत आदरणीय साहेब यांची साथ दे व आदरणीय साहेबाच्या मार्गदर्शनावर चालणारे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवार भारत तुकाराम भालके यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दे.
साहेब, पंढरपूर मधील राजकारण व येथे होत असणाऱ्या राजकीय घडामोडी आपणांस ठाऊक आहेच पण एकीकडे पैसा व एकीकडे माणुसकी असे या वेळेसचे चित्र होते त्यात विजय झाला तो माणुसकीचा. जिथे माणुसकी आणि स्वतः पवार साहेब सोबत उभे आहेत तिथे हार नावाचा प्रकार नसतो यावर आम्ही पंढरपूरकर ठाम होतो. आदरणीय साहेब पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जे साकडं घातलं होत ते माझ्या विठोबा ने पूर्ण केले तसेच एक साकडे-गाऱ्हाणं मी आपणांस या पत्राद्वारे घालतोय. साहेब देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पंढरपूरला एकदाही मंत्रीपद भेटले नाही. अनेक वेळा महामहिम राष्ट्रपती/पंतप्रधान पंढरपुरात येऊ गेले पण त्यांच्या स्वागताला पंढरपुरातील कोणी मंत्री समोर नव्हते, हे तितकेच दुःख वाटते. आदरणीय भारत नाना भालके हे गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील होत असतात व प्रत्येकाच्या अडचणीला मदत करण्यास समोर ठाम उभे असतात.
गोरगरीब जनतेसाठी पुढे येऊन जनतेसाठी लढा देत असताना स्वतःवर गुन्हे दाखल होत आहेत हे न पाहता पण समोर ठाम उभे राहून लढणारा हा नेता आहे. पंढरपूर मंगळवेढा हाच माझा मतदार संघ आहे, मी इथेच काम करणार असा कधीच विचार भारत नाना करीत नाहीत. नानाचे आपल्या मतदार संघावर प्रेम आहे तसेच पूर्ण जिल्ह्यावर प्रेम आहे त्यासाठीच आपणास एक कळकळीची विनंती करतोय की या अश्या बलाढ्य प्रेमळ असणाऱ्या आमच्या लाडक्या नेत्याला जनतेची सेवा करत असताना आपल्या सहमतीने मंत्रीमंडळात सामील करून पंढरपूरला मानाचे स्थान द्यावे.

आदरणीय साहेब ही विनंती व आपणास असणारे साकडं आहे…
आपल्या सोबत असणारा एक छोटा कार्यकर्ता
सुरज ज्ञानेश्वर पेंडाल (सोलापूर जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक), पंढरपूर

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

14 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago