सोलापुरात प्रथमच फॅशन डिझायनिंग, माँडेलिंग इन्टिट्यूटचा शुभारंभ

मिसला फेम च्या उपविजेत्या कशिश मेवाणी यांच्या हस्ते उद्घाटन

0
9

By-MH13NEWS,वेबटीम

होटगी रोडवर ईएसआय हॉस्पिटल समोरील जागेत व्हायब्रेट इन्स्टिट्युट फॉर फॅशन डिझायनिंग व मॉडेलिंग नावाने प्रशिक्षण केंद्र सेंटर सुरु करण्यात येत असून याचे उद्घाटन मंगळवारी ७ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता मिसला फेम वल्डवाईडची उपविजेती कशिश मेवाणी हिच्या हस्ते होणार असल्याची
माहिती संचालिका सोनल जव्हेरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर प्रगत होत असून पुणे – मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये फॅशन डिझायनिंग व मॉडेलिंगची क्रेझ वाढत आहे . येथील अनेक तरुण तरुणी त्याचे रितसर प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असल्याच्या पार्श्वभुमीवर हा उपक्रम सुरु करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कपड्यांचा पेहराव, हालचाल, बोलण वागणे आदी अनेक बाबींवर आजकल भर दिला जात आहे . सोलापूर शहराच्या तरुण तरुणींना ह्या क्षेत्रात आपले करिअर करता यावे याकरित ख्यातीप्राप्त फॅशन डिझायनर १८ वर्षाचा प्रदिर्घ अनुभव पाठीशी घेऊन हे इन्स्टिट्युट सुरु करीत आहेत. यामध्ये फॅशन डिझायनिंग ६ महिने व १ वर्षे तर मॉडेलिंगविषयी ३ महिने, ६ महिनेचे असे विविध कोर्सेसद्वारा प्रशिक्षण प्रदान करण्यात येणार आहे. पुण्यातील नामवंत मॉडेलींग एजन्सीजच्या माध्यमातून येथे प्रशिक्षित विद्याथ्र्यांना आपले करिअर करण्यासाठी विशेष मार्गदर्शनही केले जाणार आहे . फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस करीता सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देण्याचेही प्रयोजन असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. प्रणिती शिंदे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती या वेळी देण्यात आली.या पत्रकार परिषदेस अपूर्वा चव्हाण, संदीप जव्हेरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here