माढ्यात चोरट्यांचा धुमाकूळ लाखांचा ऐवज लंपास

0
2

ग्रामीण भागात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू

सोलापूर : भाकरे हे आपल्या  कुटुंबासह मंगळवारी रात्री घराच्या पोर्चमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी भाकरे यांच्या घराच्या पाठीमागील दारातून घरात प्रवेश केला. घराच्या पाठीमागील दार हे नुसते पुढे केलेले होते. त्याला कडी लावलेली नव्हती. त्यामुळे चोरट्यास सहजपणे आत प्रवेश करता आला. चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाट उचकटून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये असा एकूण 2 लाख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याबाबत माढा पोलिसांत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कर्मचारी महेश रामचंद्र भाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर माढा पोलिसांनी श्‍वान पथक व फिंगर प्रिंट पथक मागवले होते. श्‍वान पथकाचा याठिकाणी काही उपयोग झाला नाही. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे करीत आहेत.

माढा शहरात लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. सीसीटीव्ही बंद आहेत यामुळे चोरीच्या घटनेचा तपास करणे पोलिसांना अवघड जाणार आहे. सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here