नामदेव चव्हाण यांच्या ‘लदनी’ आत्मकथनाचे सोमवारी होणार प्रकाशन

By-MH13 NEWS,वेब/टीम

सोलापूर येथील निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नामदेव चव्हाण यांनी लिहीलेल्या ‘लदनी’ या आत्मकथनाचे सोमवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून अध्यक्षस्थानी माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख असणार आहेत, तर ज्येष्ठ साहित्यिक ‘अक्करमाशी’कार शरणकुमार लिंबाळे व आ. सिध्दाराम म्हेत्रे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती लेखक नामदेव चव्हाण आणि ‘प्रगती प्रकाशन’चे दत्ता थोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या प्रकाशन सोहळ्याला चंद्राम चव्हाण गुरुजी, सोलापुरातील जेष्ठ साहित्यिक तथा सुप्रसिद्ध कवी आणि मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे, बीड येथील आदिवासी साहित्याचे अभ्यासक साहित्यिक प्रा. डॉ. हमराज ऊईके, समीक्षक साहित्यिक प्रा. डॉ. गणेश मोहिते, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी उपमहापौर लालसिंग राठोड, उस्मानाबादचे दलितमित्र मनोहर राठोड आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार असल्याचे सांगून चव्हाण पुढे म्हणाले की, मी मुळचा सोलापूर जिल्ह्यातील चुंगी गावचा. कुरनूर या अक्कलकोट तालुक्यातीलच गावात एका लमाण (बंजारा) घरात माझा जन्म झाला. गावकुसही माझ्या वाट्याला नव्हते. पालाच्या झोपडीत जन्मलो आणि पालाच्या झोपडीत वाढलो. अतिशय कष्टातून शिक्षणाची कास धरुन न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. जन्मल्यापासून न्यायाधीश होईपर्यंतचा हा सारा प्रवास मी ‘लदनी’ या आत्मकथनात मांडला आहे. तर ‘दलित न्यायाधीशाचे आत्मकथन’ हे मी न्यायाधीश झाल्यानंतर मला आलेल्या अनुभवांवर आधारीत आहे. ‘लदनी’ आणि ‘दलित न्यायाधीशाचे आत्मकथन’ अशा दोन खंडामध्ये मी माझे आत्मकथन लिहीले आहे. ‘दलित न्यायाधीशाचे आत्मकथन’ या खंडावर अद्याप काम चालू असल्याने त्याचे प्रकाशनही येत्या काही दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. मात्र आता यातील ‘लदनी’ या पहिल्या खंडाचा प्रकाशन सोहळा आता सोमवारी होत आहे. यामध्ये मी जन्मल्यापासून न्यायाधीश होईपर्यंतचा माझा सगळा प्रवास मांडला आहे.

नामदेव चव्हाण यांचे ‘लदनी’ हे आत्मकथन महाराष्ट्रीतील बंजारा समाजाच्या परंपरा आणि चालीरितींचा सर्वंकष आढावा घेणारे मराठीतील पहिलेच पुस्तक असल्याचे यावेळी दत्ता थोरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आदिवासी आणि भटक्या विमुक्त समजातील अनेक लेखकांची आत्मकथने मराठीत आली. पण बंजारा समाजाचं जगणं इतक्या तपशीलासह मराठी साहित्यात आलं नव्हतं. चव्हाण यांच्या लदनीने ही उणीव भरुन निघणार आहे. ‘बलुतं’, ‘तराळ-अंतराळ’, ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘अक्करमाशी’, ‘कोल्हाट्याचं पोरं ’ या अशा अनेक आत्मकथनानंतर चव्हाणांचे ‘लदनी’ हे आत्मकथन मराठी साहित्यात नवी पेरणी करेल. ही पेरणी सोलापूरचे लेखक करताहेत, ही आपल्यासाठी आनंद व कौतुकाची बाब असून या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला मागास समाज सेवा मंडळाचे सचिव सुभाष चव्हाण, धानप्पा चव्हाण यांचीही उपस्थिती होती.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

17 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago