लदनी’तून लमाणांचे दुःखी जीवनाची विराणी वेशीवर: माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख

By-MH13 NEWS,वेब/टीम

सोलापूर येथील निवृत्त न्यायाधीश नामदेव चव्हाण यांच्या लदनी या आत्मकथानातून देशभरातील लमाण समाजच्या समग्र दुःखाची विराणी जगाच्या वेशीवर मांडली गेली आहे, असे गौरवोद्गार माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काढले. चव्हाण यांच्या ‘लदनी’ या आत्मकथनाचे सोमवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिर येथे थाटात प्रकाशन झाले यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर समीक्षक साहित्यिक प्रा. डॉ. गणेश मोहिते, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार निर्मलाताई , साहित्यिक श्रीकांत मोरे, उस्मानाबादचे दलीतमित्र सामाजिक कार्यकर्ते मनोहर राठोड, प्रगती प्रकाशनचे दत्ता थोरे, संयोजक सुभाष चव्हाण व नारायण चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी लमाण समाजाचे दैवत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. पुढे बोलताना देशमुख यांनी नामदेव चव्हाण यांच्या पुस्तकाचे कौतुक केले. लदनी हे एकट्या चव्हाणांचे जीवन नसून हा एक लमाण बांधवांचा सामाजिक दस्तऐवज आहे. अमावसेच्या काळ्या रात्री पालाच्या झोपडीत जन्मलेल्या चव्हाणांच्या जन्मापासून ही कथा सुरू होते आणि गाई-म्हशींच्या शेणात पोटातून फुगून आलेली ज्वारी धुवून; शिजवून खात, दारू गाळून आलेल्या पैशातून पोट भरत, प्रसंगी शेजारच्या शेतातून चोरी करून आणलेली गाजरे, मका खात कशी माणसे जगतात याचे ज्वलंत दर्शन करविते. एवढ्या कठीण स्थितीतही याडी बाबा नामदेवला शिकवतात व न्यायाधीश करतात हा प्रवास विलक्षण असल्याचे देशमुख म्हणाले.
वसंतराव नाईक यांनी लमाण समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केल्याचे सांगून सुशीलकुमार शिंदे यांनी प्रांजळपणे आत्मकथन लिहिल्याबद्दल नामदेव चव्हाणांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आत्मकथन लिहायला धाडस लागते. कारण ते सत्य लिहावे लागते. चव्हाणांनी हे आव्हान पेलले. अनेकवेळा आमकथन लिहिल्यानंतर त्या समाजातूनच लेखकाला विरोध झाला. कारण त्यांनी समाजाच्या वेदना तीव्रतेने मांडल्यामुळे अनेकांना पचले नाही. चव्हाणांचे लदनीही त्याच प्रकारे प्रहार करते. पोटासाठी दारू गळणार्या समाजाच्या समाजाच्या वेदना कुण्याही वेदनेपेक्षा जास्त तीव्र आहेत. ही कोंडी नामदेव चव्हाण यांची ‘लदनी’ तुन फोडल्याचे ते म्हणाले. प्रा. गणेश मोहिते यांनी ‘लदनी’ ने मराठी साहित्यात अनोखी भर घातल्याचे सांगून हे पुस्तक नाही तर लमाण समाजाचा वेदनादायी इतिहास आहे. एक माणूस पालातुन शिकून न्यायाधीश होतो, ही खूप प्रेरणादायी गोष्ट असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, साहित्यिक श्रीकांत मोरे, मनोहर राठोड यांचीही समयोचित भाषणे झाली. लेखकांनी आपल्या मनोगतात या पुस्तकासह माझ्या आयुष्यातील अनेक लोकांनी मला घडविले, त्यामुळेच मी मोठा होऊ शकला नाही.
प्रारंभी प्रकाशक दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. ज्योती वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर नारायण चव्हाण यांनी आभार मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! मुंबई -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

19 hours ago

आता…दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास २ तास वाढीव परवानगी

MH13 News Network दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी मुंबई, दि. ७…

21 hours ago

अनलॉक | 39 झाले बरे तर 38 नवे पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago

१० हजार | राज्यात पोलीस भरती ; शहरी व ग्रामीण तरुणांना संधी

MH13NEWS Network नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन मुंबई, दि. ७ :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच…

1 day ago

सोलापूर | ‘या’ उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

MH13news Network  बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा : विभागीय व्यवस्थापक कडू        सोलापूर,…

1 day ago