Categories: गुन्हे

मंगळवेढा न्यायालयात चाकूहल्ला : तालुक्याच्या इतिहासातील न्यायालयात घडलेली ही पहिलीच घटना

(वेब टीम/जिल्हा )

गुन्हा कबुल कर असे म्हणून रामचंद्र कोंडीबा पुजारी(रा.तामदर्डी) याने आरोपी असलेला ट्रॅक्टर चालक पांडूरंग बिरा बंडगर (वय 37, रा.तळसंगी) याच्यावर मंगळवेढा न्यायालयाच्या परिसरात डोळ्यात चटणी टाकून चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली असून याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, न्यायमंदिराच्या आवारात ही घटना घडल्यामुळे ही वार्ता वार्‍यासारखी तालुकाभर पसरली.

या घटनेची हकिकत अशी की, यातील सध्याचा फिर्यादी व घटनेतील आरोपी ट्रॅक्टरचालक पांडूरंग बंडगर हा रहाटेवाडी येथील भास्कर पाटील यांच्या टॅ्रक्टरवर सन 2017 मध्ये एम.एच-13.ए.जे-7198 या महिंद्रा ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. रहाटेवाडी येथून रावसाहेब डोके(रा.माचणूर) यांच्या शेतात ट्रॅक्टर घेवून जात असताना दहावी वर्गात शिकणारा मुलगा संकेत रामचंद्र पुजारी(रा.तामदर्डी) व त्याचे अन्य मित्र हे निरोप समारंभाकरिता शाळेकडे सकाळी 9.30 वा.जात असताना ट्रॅक्टरची धडक मोटारसायकलला बसल्याने संकेत पुजारी हा गंभीर जखमी होवून मयत झाला. याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनला याबाबतची फिर्याद दाखल होवून न्यायालयात सदर ट्रॅक्टरचालकाविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले आहे.

मंगळवार दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वा. प्रथम वर्ग न्यायालयात अपघातासंदर्भात तारीख असल्याने मयत मुलाचे वडिल रामचंद्र पुजारी आले होते. न्यायालयात बाकड्यावर दुपारी बसले असता दुपारी 1 वा.च्या दरम्यान रामचंद्र पुजारी, ट्रॅक्टरचालक पांडूरंग बंडगर यांच्याजवळ आले व त्यांनी तो गुन्हा कबुल कर असे म्हणाले. मी गुन्हा कबुल करत नाही असे म्हणताच तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून डोळ्यात चटणी टाकून चाकूने छातीवर व पोटावर उजव्या बाजूस सपासप वार केल्याचे पांडूरंग बंडगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, न्यायालयात असलेले पोलीस हवालदार चनगोंडा धानगोंडे व पो.कॉ.बापूराव पवार यांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीच्या हातातून चाकू काढून घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टाळला. जखमी व्यक्ती हल्ला होताच मोठ्याने ओरडल्याने न्यायालयात असलेले पक्षकार घटनास्थळी धावून आले. अचानक मोठा आवाज आल्याने नेमके काय घडले हे लक्षात आले  नाही. आरोपी स्वतःहून न्यायालयासमोर जावून मी हल्ला केल्याचे सांगितल्यानंतर पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले. तर जखमी पांडूरंग बंडगर यास पोलीसांनी ग्रामीण रूग्णालयात तात्काळ दाखल करून त्याच्यावर उपचार केले. न्यायालयात चटणी व चाकू घेवून आरोपी आल्यामुळे अनेक तर्क-वितर्क काढले गेले. मंगळवेढ्याच्या इतिहासातील न्यायालयात घडलेली ही पहिलीच घटना असल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात आले.

न्यायालयात येताना सुरक्षेच्या दृष्टीने यापुढे तपासणी होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेवरून उमटल्या. पोलीस प्रशासनाने यापुढे याची काळजी घेणे महत्वाचे असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

12 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

14 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

1 day ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago