ओ..मॅडम …आम्हाला सोडुन नका हो जाऊ ; चिमुकल्यांची आर्त हाक

खुदावाडी येथील शाळेत विद्यार्थ्यांनी फोडला हंबरडा

0
11

By-एम एच१३ न्यूज नेटवर्क

खुदावाडी ता तुळजापूर येथील जि.प. प्रा.शाळेतील शिक्षिका सुलभा कुलकर्णी यांची बदली झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला.एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग घडल्याने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.
संपूर्ण शाळेतील व गावातील वातावरण भावनिक झाले होते यामुळे शिक्षिका शुभदा कुलकर्णी यादेखिल गहिवरल्या.

शुभदा कुलकर्णी या मागील दोन वर्षापासून खुदावाडी येथील जि प शाळेत इयत्ता पहिली च्या वर्गाला शिकवत होत्या, त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लावला होता, अनाथ मुलांना आईची प्रेम दिलं होतं, गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांचे संगोपन करणे, व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी प्रयत्न करणे, गुणवत्ता वाढीसाठी,गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी शिक्षिका शुभदा कुलकर्णी यांनी प्रयत्न केला , त्यांची बदली होणार ही कुणकुण लागताच त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी “मँडम आम्हाला सोडुन जाऊ नका” असे भावनिक पत्रे लिहली होती.शेवटी त्यांची तुळजापूर तालुका समायोजनेमध्ये तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे बदली झाली आहे, त्यानिमित्ताने जि प शाळा खुदावाडी येथे त्यांना निरोप देण्यात आला आहे
यावेळी मुख्याध्यापक बाबुराव जाधव, वसंत कबाडे, नागनाथ जत्ते, प्रकाश राठोड, बाबासाहेब मोरे, सुनिता पुजारी, सिंधुबाई पांचाळ,दमयंती गायकवाड, सुनिता राठोड, जगन्नाथ राठोड, बालाजी काळे, अश्विनी सालगे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समीती, ग्रामपंचायत, ग्रामस्थ जड अंतःकरणाने शुभदा कुलकर्णी यांना निरोप दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here