तोपर्यंत…अश्विनी रुग्णालय बंद ठेवा ; थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज!

MH 13 NEWS Network
सोलापुरात आजपर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अश्विनी हॉस्पिटलशी संपर्कात आल्याचे आढळले आहे
सोलापुरातील कोरोना रुग्णांत अश्विनी हॉस्पिटलचा काही स्टाफ देखील समाविष्ट आहे.त्याकारणाने अश्विनी सहकारी रुग्णालय हे मागील काही दिवस बंद ठेवण्यात आले होते.परंतु आजपासून अश्विनी रुग्णालय पुन्हा सुरू होणार असल्याचे कळते.यामुळे शहरातील नागरिकांचे सेवा देणाऱ्या डॉक्टरांसह आरोग्य सेवकांचे जीव पुन्हा धोक्यात येऊ शकतात म्हणून शहरातील अश्विनी सहकारी रुग्णालय जोपर्यंत संपूर्ण निर्जंतुकीकरण आणि सर्व स्टाफ चे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत बंद ठेवावे अशी मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हाट्सअप वर पुरुषोत्तम बरडे यांनी निवेदनाचा मेसेज केला असल्याची माहिती दिली आहे.
या निवेदनात पुढे असा उल्लेख केला आहे की…

सोलापूर शहर व जिल्ह्यात दिनांक १२ एप्रिल पर्यंत एकही कोरोना पेशंट नव्हता आणि सोलापूर जिल्हा ग्रीनझोन मध्ये होता.पण १२ एप्रिल रोजी सोलापुरात पहिला कोरोनाचा पेशंट आढळला आणि आजपर्यंत म्हणजे फक्त २३ दिवसांमध्ये सोलापूर शहरात कोरोनारुग्णांची संख्या १३५ वर पोचली आहे. त्याअनुषंगाने एक अतिशय महत्त्वाची आणि चिंतेची बाब आपल्या लक्षात आणून द्यावीशी वाटते.

सोलापुर शहरात ‘अश्विनी सहकारी रुग्णालय’ नावाचे प्रसिद्ध(?) हॉस्पिटल असून तेथे सोलापुरातील नामांकित डॉक्टर सेवा देतात. सोलापूर व आजूबाजूच्या जिल्ह्यातून अनेक रुग्ण तेथे उपचारासाठी येतात.अश्विनी रुग्णालयामध्ये जवळ पास ७०० कर्मचारी, १५० डॉक्टर्स कार्यरत आहेत.माझी आपणास विनंती आहे की, डायलिसीस वगैरे सारख्या अतिमहत्वाच्या उपचारांना वगळता सदर अश्विनी रुग्णालयाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण आणि तिथे कार्यरत असणाऱ्या संपूर्ण स्टाफ व डॉक्टरांचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांची योग्य चाचणी करून, त्याच्या अहवालाचे अवलोकन झाल्याशिवाय रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात येऊ नये.

आपण महाराष्ट्राचे पालक या नात्याने मे अखेरीपर्यन्त संपूर्ण महाराष्ट्र ग्रीनझोन करण्याच्या केलेल्या आवाहनाला पूर्णत्वास नेण्यास मी कटिबद्ध आहे. आपले आवाहन पूर्णत्वास नेणे हे मी शिवसैनिक आणि महाराष्ट्राचा नागरिक असल्याने माझे परम कर्तव्य आणि जबाबदारी समजतो.

अशा निष्काळजीपणाने पुन्हा सुरू झालेले अश्विनी रुग्णालय सामान्य सोलापूरकरांसाठी व राज्याला कोरोनामुक्त करायला धडपडणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरू शकते. सोलापूरच्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आणण्याच्या दृष्टीने असे अविचारीपणाने सुरू केलेले ‘अश्विनी रुग्णालय’ घातक ठरू शकते.

तरी माझ्या कळकळीच्या विनंतीचा विचार करून अश्विनी रुग्णालय येथील स्टाफ डॉक्टर्स आणि त्या हॉस्पिटलला मागच्या काही दिवसांत भेट दिलेल्या लोकांच्या थ्रोट स्वॅब च्या चाचण्या घेऊन अनुकूल अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सदरचे हॉस्पिटल सुरू करू नये अशी मी आपणास मागणी करतो.

श्री. पुरषोत्तम दत्तात्रय बरडे
शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख

आज रूग्णालय सुरू केले नाही.निर्जंतुकीकरण सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागू शकतात त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

राजेंद्र घुली, वैद्यकीय अधिकारी

अश्विनी रुग्णालय

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago