पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर असे ठेवा ‘लक्ष’- महाराष्ट्र सायबर

MH13 News Network

पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे  करण्यात येत आहे.

विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांना विनंती करते की, आपले पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची माहिती करून घ्या, तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व कॉम्पुटरद्वारे कोणत्या वेबसाइट्सवर क्लिक करत आहेत,किंवा काय वेबसाईट ब्राऊज करत आहेत यावर लक्ष ठेवा.

पोर्नोग्राफिक टाळा

स्वतः सुद्धा पोर्नोग्राफिक वेबसाईट शोधून त्यावर क्लिक करणे टाळा कारण सध्या चाईल्ड पोर्नोग्राफीचे बघण्याचे  प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळा, तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा. जर कोणत्याही पालकास असे निदर्शनास आले की, आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन घोटाळा (fraud) किंवा ऑनलाईन रॅकेटमध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण द्यावी. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका,असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

9 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago