सोनेरी भंडाऱ्याची मुक्त उधळण, पारंपारिक झांज – धनगरी ढोलांचा निनादात कासेगांवात बिरुदेव यात्रा साजरी

By-MH13NEWS

सोलापूर, दि / प्रतिनिधी : कासेगाव येथे सोनेरी भंडाऱ्याची मुक्त उधळण, पारंपारिक झांज – धनगरी ढोलांचा निनाद आणि बिरुदेवाचा जयजयकार करीत बिरुदेव यात्रा पालखी उत्सवाने साजरी करण्यात आली. यावेळी कासेगावच्या पंचक्रोशीतील धनगर बांधव आणि इरकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे परंपरेप्रमाणे श्रध्दाभावासह शिस्तबद्ध पध्दतीने आज बिरुदेव यात्रा पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कासेगाव येथील मच्छिंद्र सातपुते यांच्या घरापासून सकाळी बिरूदेवाची पालखी काढण्यात आली. ही पालखीची प्रदक्षिणा झाल्यावर बिरोबा वस्ती बिरूदेव मंदिराकडे रवाना झाली.

पालखी मार्गावर मिरवणुकीत सहभागी झालेले धनगर बांधव मुक्तहस्ताने भंडाऱ्याची उधळण करीत होते. या यात्रेत सहभागी झालेले जवळपास ६० पेक्षा अधिक धनगरी ढोल आणि इरकरी परंपरेप्रमाणे आपल्या सादरीकरण करीत होते. अंगावर पिवळा धमक भंडारा अन् खांद्यावरचं घोंगडे त्यांची ओळख जपत होते.

कासेगांवपासून जवळच असलेले खडकी, मार्डी आणि अन्य गावांतून आलेले ५० – ६० ढोलकरी आणि इरकरी या पालखी मिरवणुकीचे जणू आकर्षण ठरले होते. सकाळी निघालेली बिरू देवाची पालखी सायंकाळी बिरोबा वस्तीतील बिरोबा मंदिरात पोहोचली. यावेळी पूजा – आरतीनंतर नैवद्य दाखवण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद वाटप आणि यात्रेची सांगता झाली. यावेळी बिरोबा वस्ती येथे मेंढ्या पळवण्याचाही कार्यक्रम झाला.

ही यात्रा यशस्वी करण्यासाठी श्याम हुडकर, म्हाळप्पा गुड्ड, नागू हट्टीवाले, नागू भक्ते, सचिन क्षिरसागर, दिलीप क्षिरसागर, राम हुडकर, लक्ष्मण हुडकर आणि राजमाता तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! मुंबई -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

19 hours ago

आता…दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास २ तास वाढीव परवानगी

MH13 News Network दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी मुंबई, दि. ७…

20 hours ago

अनलॉक | 39 झाले बरे तर 38 नवे पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

22 hours ago

१० हजार | राज्यात पोलीस भरती ; शहरी व ग्रामीण तरुणांना संधी

MH13NEWS Network नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन मुंबई, दि. ७ :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच…

1 day ago

सोलापूर | ‘या’ उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

MH13news Network  बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा : विभागीय व्यवस्थापक कडू        सोलापूर,…

1 day ago