श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

0
7

By-MH13 NEWS,वेब/टीम

बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार 8 फेब्रुवारी 2019 रोजी गणेश जयंती निमित्त श्री मंदिरात सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक व नित्य पूजा सकाळी सात वाजता गणेश याग (होम हवन) दुपारी बारा वाजता पाळणा आणि गुलाल कार्यक्रम तसेच दुपारी एक वाजल्यापासून महाप्रसाद वाटप आदींचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षीही गणेश जयंतीचे औचित्य साधून सायंकाळी पाच वाजता श्री मंदिरात सामुहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त श्री मूर्ती स व मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. गणेश जयंतीच्या या शुभ दिनी श्रींचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे यांनी केले आहे व श्रीमंत मानाचा कसबा गणपती महिला मंडळ आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमास महिला भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून श्रींचा आशीर्वाद प्राप्त करावा असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष प्रतीक थोबडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here