यंदा सांगोल्यातून परिवर्तनाची मशाल पेटवा : सुभाष देशमुख

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कडलास येथे सभा

0
2

by-MH13 NEWSनेटवर्क 

ऊसापासून साखर आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला तालुक्यातील कडलास येथे गावभेट दौऱ्यात आयोजित सभेत ते बोलत होते. तालुक्यातील तसेच गावातील समस्या त्या त्या लोकप्रतिनिधीकडून सोडवली गेली पाहिजेत, मागील ५० वर्षात सांगोला तालुक्याने भाजपचा लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही. त्यामुळे या तालुक्याचे चित्र मागास राहील आहे. यंदा माढा लोकसभेसाठी आपल मत म्हणजे आपल्या परिसरासोबत देशाचे परिवर्तन करणारे ठरणार आहे.

पुढे देशमुख म्हणाले कि, तालुक्यातील शेतकरी जास्त कष्टकरी आहे. त्यांचा विचार काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला नाही, मागील काळात चाऱ्या छावण्या होत्या. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. अशा लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत गावाचा विकास खुंटवून ठेवला अशी टीका सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी केली. निवडणूक झाल्यांनतर सरसकट सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांनी कमी भावाने माल विकू नये. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारदर्शक कारभार चालावा शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी ई-नाम प्रणाली राबवून बाजार समित्या संगणकीकृत करण्यात येत आहेत हा निर्णय शेतकरी हितासाठी आणि संचालकांच्या मनमर्जी कारभारावर आळा घालण्यासाठी भाजप सरकारने घेतला असल्याचे सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहित-पाटील, भाजपा नेते शशिकांत देशमुख, राजश्री नागणे-पाटील, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, अविनाश कोळी, सुनील पवार, मानस कमलापूरकर, डॉ. केदार, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here