Categories: राजकीय

काँग्रेसला निवडून देऊन होईल प्रगतीचा मार्ग प्रशस्त ; ज्योतिरादित्य सिंधिया

सोलापूर :- एकेकाळी औद्योगिक क्षेत्रात देशात अग्रेसर महाराष्ट्रात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, युवावर्गाची स्थितीदेखील दयनीय आहे. यावर मात करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला विजयी करुन प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी कर्णिकनगर येथे आयोजित जाहीर सभेत केले.

शहर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी खा. धर्मण्णा सादूल, माजी आ. प्रकाश यलगुलवार, शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी महापौर पुरणचंद्र पुंजाल, जनार्दन कारमपुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्योतिरादित्य सिंधिया पुढे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवनच जनसेवेसाठी समर्पित केले आहे. त्यांचे लक्ष्य, संकल्प ही केवळ जनसेवा हीच आहे. हीच परंपरा पुढे नेण्याचे काम प्रणितीताई करीत आहेत. सेवभाव, विचारधारा घेऊन त्या उभ्या आहेत. त्यांना विधानसभेत पाठवा. देशात परिवर्तन घडवायचे तर आधी राज्यात बदल घडवावा लागेल. त्यामुळे परिवर्तनाची सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. या परिवर्तनामुळे प्रगतीचा मार्ग प्रशस्त होऊन एक नवी ऊर्जा निर्माण होईल.

याप्रसंगी आ. प्रणितीताई म्हणाल्या, की आपण हक्काचे काम सांगता आणि मी त्याची पूर्तता करते.मी काम करते म्हणून लोक माझ्या पाठिशी उभे आहेत. या निवडणुकीत माझ्याविरोधात बिनकामाचे लोक उभे आहेत. स्वत:च्या मतदारसंघात लढायची हिंमत नसल्याने ते शहरमध्ये ते जातीचा आधार घेऊन लढत आहेत. यामुळे लोकशाहीचा पाया ढासळत आहे. लोकशाहीत काम, कर्तृत्व हेच महत्वाचे आहे. तेव्हा कर्तृत्व नसलेल्या मंडळींना जनतेने या निवडणुकीत अजिबात थारा देऊ नये, असे आवाहन आ. प्रणितीताई यांनी केले.

या सभेत माजी खा. सादूल, प्रकाश कोडम, सुनील सारंग, असद मुन्शी आदींची भाषणे झाली. यावेळी जयप्रकाश मेघनाथ येमूल, उमेश मामड्याल, दत्तू बंदपट्टे, लक्ष्मीनारायण कमटम, गोर्वधन कमटम, तिरुपती परकीपंडला, उपेंद्र ठाकर, राजन कामत, अप्पाशा म्हेत्रे, रुस्तुम कंपली आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. ज्योती वाघमारे यांनी केले.

MH13 News

Recent Posts

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

6 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

22 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

21 hours ago