समाधान आवताडे यांचेकडून वचनपूर्ती.. पंढरपूरमधील अनेक महिलांना दिली नोकरीं !

By- MH13 News,network

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवीत असताना मंगळवेढा येथील अनेक तरुणांना हाताला काम दिले आहे. आता त्याच धर्तीवर पंढरपूर ग्रामीण भागातील तरुणांनाही काम दिले आहे. याबरोबर पंढरपूर शहरातही ज्या महिलांना हाताला काम पाहिजे असल्यास त्यांच्यासाठीही आपण स्वतंत्र उद्योग उभारून वचनपूर्ती करून दाखवू असे आश्वसन निवडणुकीत दिले होते. त्यातील पहिला टप्पा म्हणून सौं अंजली समाधान आवताडे व ड्रा वृषाली पाटील यांचे पुढाकारमधून आज शहरातील अनेक महिलांना अवताडे स्पिननिंग मिल येथे नोकरीं देण्यात आली. त्यामुळे ही वचनपूर्तीची सुरुवात असल्याने युवक वर्ग आणि महिलामधून समाधान व्यक्त केले जात आहे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा सभा मतदार संघातून दोन वेळा दामाजी साखर कारखानाचे चेअरमन समाधान आवताडे यांनी निवडणूक लढविली आहे. या निवडणुकीत मंगळवेढा भागातील जनतेने क्रमांक एक चे मताधिक्य देऊन आवताडे हेच आपले आमदार असे सिद्ध करून दाखविले आहे. परंतु पंढरपूर भागातील जनतेला हा उमेदवार नवीन असल्यामुळे अजून म्हणावं तसें लोकांनी प्रतिसाद दिला नाही.

समाधान आवताडे स्वतः उद्योगपती असल्यामुळे अनेक तरुणांना हाताला काम देऊ शकतात हे पंढरपूर येथील जनतेला उशिरा समजले आहे. निवडणूक झाल्यानंतर दिलेले शब्ध पाळणारे उमेदवार काही थोडके असतात त्यातील एक असलेल्या उद्योगपती समाधान अवताडे यांनी आता आपले लक्ष पंढरपूर तालुक्यातील गावे आणि शहरात ठेवले आहे. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणूकही आवताडे गटाचे वतीने लढवणार असल्याचे मनापासून ठरवलं आहे. त्यामुळे त्यांना मानणारा एक गट तयार झाला आहे. यापुढे पंढरपूर भागातील अनेकांना हाताला काम आणि गरजूलोकांना मदत करून आपले उद्दिष्टे गाठण्याचा चंग बांधला आहे. पंढरपूर मध्ये त्यांनी मागील अनेक दिवसापासून जे संपर्क कार्यालय उघडले आहे. ते तसेच चालू ठेऊन पुढील तयारी सुरु ठेवली आहे

पंढरपूर भागातील तरुणांनाही आता समाधान आवताडे यांची ओळख वाढत चालली असल्यामुळे यापुढील काळात या वाढत चाललेल्या ओळखीचा नक्की फायदा होणार आहे. त्यामुळे अवताडे यांनी आता आपले सर्व लक्ष पंढरपूर भागाकडे दिले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अंत्योदय लाभार्थ्यांना 11 एप्रिल नंतर मोफत धान्य वाटप

सोलापूर दि. 5 : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना…

10 hours ago

लॉकडाऊन : पोलिसांचा ‘ॲक्शन’ मोड ; शेकडो वाहने जागेवरच जप्त

MH13 NEWS Network कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केलेले आहे,मात्र अनेक लोक…

13 hours ago

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई – कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून सध्या राज्यात 490 रुग्ण आहेत. गेल्या 24…

23 hours ago

धक्कादायक :1023 तबलिगींना कोरोनाची लागण; देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

नवी दिल्ली | देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित आहेत. देशातील 17…

1 day ago

मुख्यमंत्र्यांकडून झालेल्या कौतुकामुळे आराध्याचे कुटुंबिय भारावले

दि. 4 : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कौतुकामुळे आराध्या कडूचे कुटुंबिय भारावून गेले. आराध्याने…

1 day ago