जिजाऊ – सावित्री दशरात्रोत्सव ; मराठा सेवा संघाच्यावतीने महीलांचा सन्मान

मराठा सेवा संघाच्यावतीने ३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान जिजाऊ – सावित्री दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याची सांगता सर्व क्षेत्रातील महीलांचा सन्मान करुन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील होते. घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचाराची तरुण पिढी निर्माण होण्यासाठी महिलांनी राजमाता जिजाऊचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन संस्कारक्षमपिढी घडवावी असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्ष उज्वला साळुंखे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. मराठा सेवा संघाच्या कार्यालयात जिजाऊ जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. . याप्रसंगी विचारपिठावर जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय अध्यक्ष निर्मला शेळवणे, जिल्हा अध्यक्ष उज्वला साळुंखे, सुनिता पाटील , लता ढेरे, प्रियांका डोंगरे, शहर अध्यक्ष सदाशिव पवार, खजिनदार आर. पी. पाटील, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जीवन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणार्‌या महिलांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रमात जिजाऊना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला शिक्षक आघाडी शहर प्रमुख शुभांगी निंबाळकर , अभिंजली जाधव, लता ढेरे, प्रियांका डोंगरे, कल्याण गव्हाणे, गोवर्धन गुंड, हणमंत पवार, प्रतिज्ञा भोसले, नितिन जाधव,दिपक शेळके,बब्रुवाहन गुंड इत्यादी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जीवन यादव यांनी केले. तर आभार सदाशिव पवार यांनी मानले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

9 mins ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

3 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

7 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

21 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

22 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago