सोलापूरच्या उपमहापौराला सोडून देणे पडले महागात ; उपनिरीक्षक निलंबित

MH13 NEWS Network

उपमहापौर राजेश काळे यांच्यामुळे पोलीस उपनिरीक्षक निलंबित

पिंपरी : फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौर राजेश काळे यांना पोलिसांनी सोडून दिले. या प्रकरणाची खातेअंतर्गत चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवीच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना कंट्रोलला संलग्न करण्यात आले तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.
सांगवी परिसरात एकच फ्लॅट अनेकांना विक्री करुन फसवणूक केल्याचा सोलापूर महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास करताना सांगवी पोलिसांनी काळे यांना सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्यांना सांगवी येथे आणले.

दुस-याच दिवशी काळे यांना सांगवी पोलिसांनी काळे हे खोकत होते, थंडी, ताप असल्याचे सांगत होते, त्यामुळे त्यांना सोडण्यात आले. शिंका आणि खोकला येत असल्याने वैद्यकीय तपासणी करून नोटीस बजावत कोरोनाच्या भितीने सोडण्यात आले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत खातेअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली.
स्वतःच्या कामात कसुरु केल्याचा ठपका लावत पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी निरीक्षक साबळे यांना कंट्रोल ला संलग्न तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबित केले आहे.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago