आयपीएल सट्टाबाजार ; चौघा बुकींना मिळाला जामीन

MH13 NEWS Network

सोलापूर शहर जिल्हा परिसरात आयपीएल सट्टाबाजार ने धुमाकूळ घातला होता. यामध्ये अनेकांची घरे-दारे दुकाने गहाण पडली आहेत. या सट्टा बाजारात फसलेल्या काही युवकांनी स्वतःचा जीवही दिला. सोलापूर शहर पोलिसांनी आयपीएल’वर सट्टा घेणाऱ्या काही बुकींना अटक केली होती. न्यायालयासमोर उभे केले असता त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेणाऱ्या चौघा बुकींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. आर. देवकते यांनी जामीन मंजूर केला. शहर गुन्हे शाखेने अवंतीनगर भाग २ मधील पर्ल हाईटस्मधील फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी चेतन रामचंद्र वन्नाल ( वय २६, रा. गांधीनगर झोपडपट्टी क्र.३ ), विघ्नेश नागनाथ गाजूल ( वय २४, रा. भद्रावती पेठ ) या दोघांना अटक करण्यात आली.

हे दोघे मोबाइलद्वारे सट्टा लावणाऱ्या लोकांकडून सट्टा घेऊन त्याचा हिशेब करीत असताना सापडले. अटकेतील दोघांची चौकशी केल्यानंतर अतुल सुरेश शिवशेट्टी ( रा. अवंतीनगर ) व प्रदीप मल्लय्या कारंजे ( रा. भवानी पेठ ) यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून ३ लाख ४० हजारांची रोकड यासह सुमारे ३८ लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

या प्रकरणी चारही आरोपींनी जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. त्याची सुनावणी होऊन त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला . यात आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर, ॲड. सागर पाटील, ॲड. सारंग काकडे यांनी काम पाहिले..

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

‘तुळशी विवाह’ साजरा करण्याची पद्धत, दर्शनाचे महत्त्व, आध्यात्मिक वैशिष्ट्ये

तुळशी विवाह या वर्षी तुळशी विवाह कालावधी कार्तिक शुद्ध द्वादशी (२६ नोव्हेंबर) पासून ते कार्तिक…

6 hours ago

आता…तुम्हीच ‘स्वामी’ ; जिल्ह्यात आढळले 247 शिक्षक अन् कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ तर 17167 जण…

महेश हणमे /9890440480 सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेल्या मुक्या शाळा…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; सोलापुरातील 11 शिक्षक ,दोन शिपाई कोरोनाबाधित ; 943 अहवाल अजूनही पेंडिंग…

महेश हणमे /9890440480 सोलापूर (Solapur City) शहरातील शाळा सुरू झाल्या असून त्या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील…

1 day ago

निराधारांना दिली एम.के.फाऊंडेशने मायेची उब !

पहाटेच्या सुमारास शेकडो निराधाराना ब्लॅंकेट वाटप. चोर पावलांनी येणाऱ्या थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची…

3 days ago

सोलापूर | सोमवारी वाजणार शाळांची घंटा ; असं आहे नियोजन

MH13 News Network सोलापूर शहरातील शाळांची घंटा उद्यापासून वाजणार असून त्या अनुषंगाने संसर्ग वाढू नये…

4 days ago

‘पक्का जॉब’ | सरळ जॉइनिंग जाहिरातीने घातला गंडा ; महिलेची फसवणूक

महेश हणमे/9890440480 विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर…

4 days ago